शशिकांत वारीशे हत्या प्रकरणात ठाकरे गटाचे आमदार अडचणीत

    17-Mar-2023
Total Views |

Rajan Salavi


रत्नागिरी ( Shashikant Warishe )  : 
नाणार रिफायनरीला विरोध करणारे पत्रकार शशिकांत वारिसे Shashikant Warishe यांच्या हत्या प्रकरणात नवे वळण आले आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यात अडचणीत येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वारिसेंच्या हत्येप्रकरणात आरोपी पंढरीनाथ आंबेरकर अटकेत आहे. हत्येच्या दिवशी आंबेरकर आणि साळवींचा खासगी स्वीय सहाय्यक रोमेश नार्वेकर यांच्यात संपर्क झाल्याचा सीडीआर रिपोर्ट पोलीसांना सापडला आहे.

हत्येपूर्वी आणि हत्येनंतर आरोपीसह नार्वेकर यांची चर्चा झाली होती. या प्रकरणात नार्वेकर यांचा २५ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. या प्रकरणात जे कुणी असतील त्यांची सखोल चौकशी व्हावी. चौकशीत शिवसेनेला बदनाम करण्यासाठी जर प्रयत्न केला जात असेल तर हे चुकीचे आहे. वारिसेंचा जो हत्यारा आहे त्याला निश्चितच फाशी दिली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नाणार परिसरात शशिकांत वारिशे ( Shashikant Warishe ) यांची जाणीवपूर्वक वाहन अपघात घडवून हत्या केली. या प्रकरणात एसआयटी अधिक तपास करत आहे, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.