सौम्य लक्षणे असणाऱ्यांना १० दिवसांत डिस्चार्ज, पण...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020
Total Views |

corona 19_1  H
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोणाचा वाढता संसर्ग पाहता प्रशासन योग्य ते उपाययोजना करत आहेत. अशामध्ये अनेक ठिकाणी सरकारी आणि खासगी रुग्णालये, तसेच इतर ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्णांनी भरले आहेत. अशामध्ये आता आरोग्य मंत्रालयाने कोरोनाग्रस्तांना रुग्णालयातून मिळणाऱ्या डिस्चार्ज संदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना अवघ्या १० दिवसांमध्ये रुग्णालयातून घरी सोडले जाणार आहे. पण याआधी काही अटींची पूर्तता केल्याशिवाय हा नियम लागू होणार नाही.
 
 
 
 
 
 
 
सुधारित नियमानुसार, अतिशय सौम्य, सौम्य आणि प्राथमिक लक्षणे असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना ‘कोव्हिड केअर फॅसिलिटी’मध्ये दाखल केले जाणार आहे. त्यांच्या शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाण नियमित तपासले जाणार आहे. अशा रुग्णांना १० दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. पण, डिस्चार्ज देत असताना त्यांना ताप असू नये. विशेष म्हणजे, अशा रुग्णांना ताप नसल्यास डिस्चार्ज देताना कोरोना टेस्ट करावे लागणार नाही. तरीही त्यांना घरातच ७ दिवसांसाठी स्वतःच्या घरी विलगीकृत राहावे लागणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@