नासा-स्पेस एक्सच्या अंतराळयानाचे यशस्वी उड्डाण!

    31-May-2020
Total Views | 68
Space X_1  H x


‘कॅप्सूल यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचले, दोन्ही अंतराळवीर सुरक्षित!’, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती


वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने खासगी कंपनी स्पेसएक्सच्या अंतराळ यानातून २ अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठविले. भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास रॉकेट केनेडीने स्पेस सेंटर येथून उड्डाण केले. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ही उड्डाण पाहण्यासाठी फ्लोरिडास्थित अंतराळ केंद्रात गेले होते. प्रक्षेपणानंतर काही तासांनी त्यांनी माहिती देताना सांगितले की, स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूल यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचला आहे. दोन्ही अंतराळवीर सुरक्षित आणि स्वस्थ आहेत.


यावेळी ट्रम्प म्हणाले की, या लॉन्चसह मागील एक दशकाचे आमचे प्रयत्न औपचारिकरित्या पूर्ण झाले. अमेरिकेच्या अपेक्षांचे नवे पर्व सुरू झाले आहे. अमेरिकन अंतराळवीरांना पृथ्वीच्या कक्षेत पाठविण्याच्या कार्यासाठी देशातील जुने नेते इतर देशांच्या दयेवर अवलंबून होते. मात्र हे आता यापुढे होणार नाही.


या मिशनला 'क्रू-डेमो-२' आणि रॉकेटला 'क्री-ड्रॅगन' नाव देण्यात आले आहे. याद्वारे नासाचे अंतराळवीर रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले १९ तासांत आयएसएस पोहचतील. २१ जुलै २०११ नंतर पहिल्यांदा अमेरिकेच्या धरतीवरून एखादे मानव मिशन अंतराळात पाठवण्यात आले. स्पेसक्राफ्टची लॉन्चिंग अमेरिकेच्या विश्वासू रॉकेट फॉल्कन-९ने करण्यात आली. स्पेसएक्स अमेरिकन उद्योगपती अॅलॉन मस्क यांची कंपनी आहे. ही कंपनी नासाबरोबर भविष्यातील अनेक अंतराळ मोहिमांवर काम करीत आहे.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121