अमिताभ बच्चन-आयुष्मानचा ‘गुलाबो सीताबो’ अ‍ॅमेझॉन प्राइमवर होणार प्रदर्शित!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-May-2020
Total Views |

Gulabo Sitabo_1 &nbs



एकाच दिवशी आणि एकाचवेळी २०० देशांत प्रदर्शित होणार!


मुंबई : कोरोना विषाणूमुळे देशभर चित्रपटगृह बंद आहेत. अशा परिस्थितीत अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, आयुष्मान खुराना आणि अमिताभ बच्चन यांचा चित्रपट ‘गुलाबो सीताबो’ ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ जून २०२० रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरून हा चित्रपट एकाच वेळी दोनशे देशांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. अमिताभ आणि आयुष्मान यांनी स्वत: सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली आहे.





ट्विटरवर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एका प्रतिष्ठित व्यक्तीची आणि त्याच्या भाडेकरूची कहाणी.’ पोस्टरमध्ये अमिताभ एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर त्यात आयुष्मान खुरानाच्या लूकची झलकदेखील यांत दिसत आहे. आयुष्मान खुरानाने इंस्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर शेअर करत ‘लवकरात लवकर तुमचे तिकीट बुक करा’, असे आवाहन चाहत्यांना केले आहे.





या चित्रपटात अमिताभ लखनऊच्या जमीनदारांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवरून चित्रपट प्रदर्शित करण्याच्या संकल्पनेवर आयुष्मान जरासा नाराज असला तरी अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘हा एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे आणि आम्ही सर्वजण आनंदी आहोत, की आम्ही हा चित्रपट अशा प्रकारे संपूर्ण जगासमोर आणत आहोत. 'गुलाबो सीताबो' मध्ये जीवनाचा आनंद आहे. हा असा एक विनोद चित्रपट आहे की जो घरातील सर्व लोक एकत्र बसून पाहू शकतात.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@