डॉ. मनमोहनसिंग यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2020
Total Views |

DR. manmohan singh_1 



छातीत दुखल्यामुळे त्यांना रविवारी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते


नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज मंगळवारी दिल्ली येथील एम्स रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान ८७ वर्षीय मनमोहन सिंग यांना रविवार रात्री छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एम्स रूग्णालयात त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची कोरोन चाचणी देखील करण्यात आली.


मनमोहन सिंग यांना एम्स रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. डॉ.नितिश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले होते. सोमवारी त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा दिसून आली. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे.


डॉ. मनमोहन सिंग यांना नव्या औषधाची रिअ‍ॅक्शन झाल्याचे सांगण्यात आले आहे. २००९ साली डॉ.सिंग यांचे बायपासचे ऑपरेशन झाले होते. त्यावर त्यांची नियमित औषधे सुरु होती. याच औषधांपैकी काही बदललेल्या औषधांचा त्रास त्यांना झाला होता. मात्र आता ते ठीक असून, एम्समधील डॉक्टरांच्या सल्लाने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@