नवी दिल्ली : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या ही १६ हजार ७१ वर पोहोचली आहे. रविवारी महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या ही ३६४८ इतकी होती. शनिवारी देशात सर्वात जास्त १३७१ संक्रमित रुग्ण आढळले. तसेच एका दिवसांत ४२६ रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली आहे.
covid19india.org आणि राज्य सरकारांतर्फे जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती उघड झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत देशात १५ हजार ७१२ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १२ हजार ९७४ जणांवर उपचार सुरू आहेत तर एकूण मृतांचा आकडा हा ५०७वर पोहोचला आहे.
२७ राज्यांमध्ये ७ केंद्रशासित प्रदेशांत कोरोनाचे संक्रमण
कोरोना विषाणू देशभरातील २७ राज्यांमध्ये पसरला आहे. देशातील केंद्रशासित प्रदेशांतही याचा फैलाव वाढला आहे. त्यातील
दिल्ली, चंडीगड, अंदमान निकोबार, दादर व नगर हवेली, जम्मू काश्मीर आणि लडाख यांचाही सामावेश आहे.
राज्य कोरोनाबाधित बरे झालेले रुग्ण मृत्यू
महाराष्ट्र ३६४८ ३६५ २१२
दिल्ली १८९३ २०७ ४२
तमिळनाडू १३७२ ३६५ १५
मध्यप्रदेश १४०२ १२७ ७०
राजस्थान १३९५ २०५ २२
गुजरात १६०४ ९४ ५८
उत्तर प्रदेश ९७४ १०८ १५
तेलंगणा ८०९ १८७ १८
आंध्रप्रदेश ६४७ ६५ १६
केरळ ३९९ २५७ ३
कर्नाटक ३८८ १०४ १४
जम्मू-कश्मीर ३४१ ५१ ५
पश्चिम बंगाल ३१० ६२ १२