फाशी नको, मला जन्मठेप द्या!

    28-Feb-2020
Total Views | 131
pawan gupta_1  



निर्भायाच्या गुन्हेगाराची न्यायालयाला विनंती

मुंबई : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौथा दोषी पवन कुमार गुप्ता याने सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह याचिका दाखल केली आहे. ३ मार्चला होणाऱ्या फाशीपूर्वी पवन गुप्ताने आपल्याला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेत बदल करून ती आजन्म कारावास अशी करावी अशी विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे. पवन गुप्ता याचे वकील ए. पी. सिंह यांनी कोर्टात ही माहिती दिली.


ट्रायल कोर्टाने निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यासाठी ३ मार्चचे डेथ वॉरन्ट जारी केले आहे. येत्या सोमवारी पवन गुप्ताची याचिका सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीदरम्यान फेटाळण्याची शक्यता आहे.


पवनच्या क्यूरेटीव्ह याचिकेनंतर राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा कायदेशीर अधिकार अद्याप शिल्लक आहे. सुप्रीम कोर्टात क्यूरेटीव्ह याचिका फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींना केलेल्या दया याचिकेवर निर्णय येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. हे लक्षात घेता ३ मार्चला डेथ वॉरन्टची अंमलबजावणी होणे कठीण असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणूनच तीन मार्च नंतर नव्या तारखेचे डेथ वॉरन्ट निघेल असे म्हटले जात आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121