दिल्ली जाळण्याचे षड्यंत्र कोणाचे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
Editorial on Delhi riots




मुसलमानांच्या मनात भीती कालवून भारत विखंडन शक्तींनी एका पोलिसाच्या कुटुंबाला पोरके केले, तसेच आणखी नऊ जणांचा बळी घेत त्या त्या परिवारांचाही आधार हिसकावला, तर शेकडोंच्या संख्येत लोकांना जखमी केले. भिवंडीतील पोलीस चौकी जाळत पोलिसांना ठेचणारी आणि मुंबईतील अमर जवान ज्योतीवर लाथा घालणारी मानसिकता एकच हेही इथे समजून घेतले पाहिजे.

 

'सीएए'विरोधकांचा दिल्लीत धुमाकूळ, एका हेड कॉन्स्टेबलसह तेरा जण ठार - बातमी. गेल्याच वर्षी धार्मिक अत्याचारग्रस्त हिंदू व अन्य अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देणारा कायदा-'सीएए' केंद्र सरकारने मंजूर केला आणि देशातील 'जमात-ए-पुरोगामी' व 'तुकडे तुकडे गँग'च्या सर्वांगाला मिरच्या झोंबल्या. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील पीडितांमध्ये केवळ हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ख्रिश्चनांचाच समावेश का, मुसलमानांचे नाव त्यात का नाही, यावरून छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांनी एकच कल्ला सुरू केला.

 

तसेच देशातील मुसलमानांना भडकविण्यासाठी, चिथावण्यासाठी डाव्या-काँग्रेसी पिलावळी सक्रिय झाल्या नि त्यांनी 'सीएए'चा संबंध अस्तित्वात नसलेल्या 'एनआरसी' व 'एनपीआर'शी जोडला. सरकारकडून वेळोवेळी स्पष्टीकरणे देऊनही 'सीएए', 'एनआरसी' आणि 'एनपीआर'च्या माध्यमातून अन्य देशांतील हिंदूंना भारतात आणून इथल्या मुसलमानांना हाकलून देण्याचा डाव असल्याच्या अफवा या लोकांनी पसरवल्या. कथित बुद्धीजीवी, विचारवंतही यासाठी कामाला लागले आणि त्यांच्याकडून कशाचाही संबंध कशाशीही लावून दिल्याने धर्मवेडा मुसलमान डोक्यात राख घालून रस्त्यावर उतरला. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठापासून देशभरातील विविध विद्यापीठांत 'सीएए', 'एनआरसी' व 'एनपीआर'विरोधातील हिंसक आंदोलने हे त्याचेच निदर्शक. इथे केंद्र सरकारच्या नावाने गळा काढत वळवळणारे कोण होते, हे पाहिल्यास त्यात धर्मांध मुस्लीम आणि त्यांच्या पाठीराख्यांचे एकच एक टोळके असल्याचे लक्षात येते. मात्र, मुख्य प्रवाहातील माध्यमांनी थेट मुसलमानांचे नाव न घेता केंद्राच्या निर्णयाला सर्वधर्मीयांचा विरोध, अशीच टेप चालवली, जेणेकरून आपल्या भाईजान-चाचाजानचा बचाव करता येईल.

 

देशातील विविध शहरांत या घडामोडी होत असतानाच दिल्लीतील शाहीनबागेत बुरख्यातल्या वाघिणी (की कुराण आणि हदीसमधील मागास व अमानुष रुढी-परंपरांपुढे पटापट माना झुकवणार्‍या शेळ्या?) एकवटून 'सीएए', 'एनआरसी' व 'एनपीआर'विरोधात बें बें करू लागल्या. उल्लेखनीय म्हणजे, शाहीनबागेतील महिलांचे आंदोलन शांततेत आणि सनदशीर मार्गाने चालू असल्याचे चित्रही माध्यमांनी रंगवले. परंतु, याच शाहीनबागेतील महिलांमुळे स्थानिकांना, व्यापार्‍यांना, विद्यार्थ्यांना, नोकरदारांना, रुग्णांना त्रास-मनस्ताप होत असल्याचे सोयरसुतक कोणालाही राहिले नाही. इथल्या निष्ठुर महिलांनी रुग्णवाहिकेला जायलादेखील जागा करून दिली नाही, ज्यामुळे रुग्णाचा मृत्यूही झाला. परिणामी, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही, चर्चेसाठी मध्यस्थ नेमूनही तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ एकाच जागेवर ठिय्या मांडून रस्ता अडवल्याने या महिला व त्यांच्या मालकांविरोधात सर्वसामान्य जनतेत असंतोषाचा वणवा धगधगू लागला.

 

मात्र, महिला असल्याचे पाहून कोणीही स्पष्टपणे काही बोलत नव्हते वा कृती करत नव्हते. त्यातूनच विधानसभा निवडणुकीनंतर 'आप'ले सरकार आल्याचे पाहून इथल्या चळवळ्यांच्या आणि साथीदारांच्या मना-मेंदूत आपण संपूर्ण दिल्लीलाच नव्हे तर देशालाही वेठीस धरू शकतोचा मुजोरपणा शिरला. शाहीनबागेनंतर जाफराबाद, सीलमपूर, चांदबाग, मौजपूर आदी ठिकाणीही असलेच चाळे करण्याचे या लोकांनी ठरवले. परंतु, हा फक्त वरवरचा देखावा होता आणि आतले खरे षड्यंत्र निराळेच होते. आंदोलनांच्या माध्यमातून विस्फोटक विचारांचा दारूगोळा अन्यत्रच्या मुसलमानांच्या डोक्यात भिनवण्याचे त्यांचे कट-कारस्थान होते. जेणेकरून एकाच वेळी राजधानी दिल्ली ठप्प पडेल, ठिकठिकाणी दंगली उसळतील आणि दोन धर्मात संघर्षाचा भडका उडेल. उल्लेखनीय म्हणजे, नेमके याचवेळी एमआयएमच्या वारिस पठाण यांचे “आम्ही १५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंवर भारी पडू,” हे विधानही समोर आले. परंतु, असे काहीही होऊ नये, दिल्लीसह देशात शांतता नांदावी, सौहार्दाचे वातावरण राहावे आणि 'सीएए', 'एनआरसी', 'एनपीआर'च्या अडाणी विरोधकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, यासाठी स्थानिकांनी मोर्चाचे आयोजन केले.
 

आमच्या आंदोलनासमोर अन्य कुणी मोर्चा काढण्याची हिंमत कशी करतोचा राग येऊन 'सीएए', 'एनआरसी' व 'एनपीआर' विरोधकांनी मात्र आपले खायचे दात दाखवले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आल्याची संधी साधून देशविघातक आणि समाजशांतीद्वेष्ट्या झुंडींनी दिल्लीच्या रस्त्यारस्त्यांत, चौकाचौकांत, मेट्रो स्थानकांनजीक नंगानाच चालू केला. शाहीनबागेत बायका व लहान मुलांना पुढे करून साळसूदपणाचा आव आणणार्‍यांनी पद्धतशीरपणे हिंदू वस्तींवर, दुकानांवर, वाहनांवर दगडफेकीला, जाळपोळीला, मारहाणीला, तोडफोडीला सुरुवात केली. संविधान आणि तिरंग्याच्या आड लपून आंदोलन करणार्‍या कट्टरवाद्यांनी 'नारा-ए-तकबीर' आणि 'अल्ला-हूँ-अकबर'च्या घोषणा देत दिल्ली जाळण्यासाठी कंबर कसली.

 

शाहीनबागेतील चिमुकल्याच्या मृत्यूला 'कुर्बानी'चे नाव देत त्याचे भांडवल करणार्‍यांनी खुनशी खेळ चालू केला आणि दिल्लीतील मौजपूर, चांदबाग, बाबरपूर, जाफराबाद, करावल नगर, भजनपुरा, गोकलपुरीसह कितीतरी ठिकाणे धुमसू लागली. दंगलखोरांना आवरण्यासाठी आलेल्या पोलिसांना आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जाणार्‍या अग्निशमन दलाच्या बंबावरही या लोकांनी हल्ले केले. विशेष म्हणजे, आतापर्यंत दगडफेक, जाळपोळ करणार्‍या आंदोलकांनी पिस्तुलातून गोळीबारालाही सुरुवात केली. मोदी-शाह यांना पाण्यात पाहणार्‍यांनी खोट्यानाट्या बातम्या पेरून केलेला अपप्रचार अशाप्रकारे दिल्लीच्या रस्त्यावर रक्तरंजित धुडगूस घालू लागला आणि त्यातच हेडकॉन्स्टेबल रतन लाल यांचा जीव गेला. मोहम्मद शाहरुख नावाच्या दंगलखोराने पिस्तुलातून गोळ्या झाडत रतनलाल यांचा खून केला आणि त्यांनी आपल्या मुलांना दिलेले होळीला गावी जाण्याचे वचन अधुरेच राहिले. मुसलमानांच्या मनात भीती कालवून भारत विखंडन शक्तींनी एका पोलिसाच्या कुटुंबाला पोरके केले, तसेच आणखी बारा जणांचा बळी घेत त्या त्या परिवारांचाही आधार हिसकावला, तर शेकडोंच्या संख्येत लोकांना जखमी केले. इतकेच नव्हे तर मंगळवारी सायंकाळी हिंसेचे थैमान घालणार्‍यांनी निमलष्करी दलाच्या जवानांवर अ‍ॅसिड फेकण्याचे निर्घृण कृत्यही केले. भिवंडीतील पोलीस चौकी जाळत पोलिसांना ठेचणारी आणि मुंबईतील अमर जवान ज्योतीवर लाथा घालणारी मानसिकता एकच हेही इथे समजून घेतले पाहिजे.

 

मोहम्मद शाहरुखच्या गोळीबाराचे कांड होऊन त्या एका पोलिसाची हत्या होऊनही मुख्य प्रवाहातील माध्यमांनी मात्र ही बातमी दाबण्याचे, नाव समोर येऊ न देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. परंतु, मागच्याच महिन्यात एका हिंदू नाव असलेल्या युवकाने गोळीबार केला तर तमाम माध्यमे, कथित पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी मंडळी हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, भाजप-संघाचा फॅसिझम, नाझीवादाच्या आरोळ्या ठोकत चेकाळल्याचे आपण सर्वांनीच पाहिले. इतरवेळी 'दहशतवादाला धर्म नसतो'चा रट्टा मारणार्‍यांनी त्यावेळी हिंदूंंना दहशतवादी ठरवण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.

 

पण, मग मोहम्मद शाहरुखने तेच कृत्य केले, तर या दहशतवादाचे नाव घ्यायला का त्यांची जीभ कचरली? तथापि, त्यांनी नाव घेतले नाही तरी आताच्या सोशल मीडियाच्या जमान्यात छद्म पुरोगामी आणि छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांची बनवेगिरी फार काळ चालू शकत नाहीच. जसे दंगलखोरांचे बुरखे फाटतील तसेच या कथित बुद्धीजीवी, विचारवंत आणि निष्पक्ष माध्यमांचे मुखवटेही गळून पडतीलच. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प देशात होते म्हणून आंदोलकांवर कठोर कारवाई केलेली नसेल तर पोलिसांनी व लष्कराने नंतर तरी या दंगलखोरांना आवर घालण्यासाठी पावले उचलावी. तरच दिल्लीतील हिंसाचार काबूत येऊ शकेल, रतन लाल यांचे बलिदान सार्थकी लागेल; अन्यथा डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्षतावादी वगैरे मंडळींनी लावलेली ही आग वाढतच राहील.





 
@@AUTHORINFO_V1@@