जम्मू काश्मीरमधील हिंसाचारात ६० टक्क्यांनी घट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020
Total Views |


dilbag singh _1 &nbs


नवी दिल्ली : दिल्लीचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीरमधील सुरक्षिततेच्या परिस्थितीची माहिती दिली. दिलबाग सिंग म्हणाले की, सन २०२०मध्ये मागील दीड महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत दहशतवादी कारवायांमध्ये साठ टक्क्यांनी घट झाली आहे.



ते म्हणाले की, सध्या जम्मू कश्मीरमध्ये कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही मोठी समस्या नाही. दहशतवाद्यांशी चकमकीच्या ठिकाणी दगडफेक होण्याच्या घटना देखील कमी झाल्या आहेत. ते म्हणाले की, यावर्षी १३ फेब्रुवारीपर्यंत २० दहशतवादी ठार झाले आहेत. चौघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात सहभागी १२ दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. ४३ओव्हर ग्राऊंड कामगारही पकडले गेले आहेत. पोलिस महासंचालकांनी सांगितले की, मारले गेलेल्या एकूण दहशतवाद्यांमध्ये १० जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचे होते. बॅन टोल प्लाझाजवळ घुसखोरीत तीन दहशतवादी ठार झाले. ११ दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीनचे आहेत.



डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मू-काश्मीर पोलिस आणि निमलष्करी दले आणि सैन्य यांच्यातील समन्वयाबद्दल त्यांचे कौतुक केले. उपराज्यपालांच्या राजवटीत कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही मोठी समस्या उद्भवली नाही याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दिलबाग सिंह म्हणाले की, सीमेवर पाळत ठेवण्याची यंत्रणा मजबूत झाली आहे. परिणामी, दहशतवादी बनणाऱ्या दक्षिण काश्मीरमधील सात तरुणांना त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@