रावण खलनायक नव्हता : सैफ अली खान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2020
Total Views |

Saif Ali Khan_1 &nbs
 
मुंबई : अभिनेता सैफ अली खान अनेकवेळा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या चर्चेत आहे. दिग्दर्शक ओम राऊत याच्या आगामी बिग बजेट 'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये तो रावणाची भूमिका साकारणार आहे. याबद्दल मुलाखत देताना म्हणाला की, " रावण हा खलनायक नव्हता.". त्याच्या या वक्तव्यावरून सोशल मिडियावर चांगलाच टीकेचा सामना करावा लागत आहे. तसेच, त्याने पुढे म्हंटले की, 'या चित्रपटात रावणाची मानवीय बाजू दाखवण्यात येणार आहे.' त्यामुळे आता चित्रपटावर बंदी घालण्याचीदेखील मागणी करण्यात येत आहे.
 
 
 
'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये सैफ अली खान 'लंकेश' म्हणजे रावणाची भूमिका साकारणार आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हंटले की “रावणाला आजवर आपण केवळ खलनायच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हता. तो देखील एक माणूस होता. रावण माणूस म्हणून कसा होता? याचं चित्रण आदिपुरुषमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रावणाने भगवान श्री राम यांच्यासोबत युद्ध केले हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याला देखील एक पार्श्वभूमी होती. रामाचे भाऊ लक्ष्मण यांनी सुर्पनखाचे नाक कापले होते. त्यानंतर हे युद्ध होणारच होते. या चित्रपटात रावणची विचारसरणी काय होती हे दाखवले जाणार आहे.”
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@