जम्मू काश्मीरला आरोग्य संजीवनी; पंतप्रधानांकडून 'सेहत' आरोग्य योजना लागू

    26-Dec-2020
Total Views | 75

 

narendra modi_1 &nbs

 


जम्मू-काश्मीरच्या १५ लाख कुटुंबाना फायदा

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सेहत' लागू होणार असल्याची घोषणा केली. या योजनेमुळे जम्मू काश्मीरमधील लोकांना मोफत आरोग्य विमा कवच मिळणार आहे. तसेच येथील प्रत्येक कुटुंबाला हे विमा कवर मिळेल.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे देशातील इतर नागरिकांबरोबरच जम्मू काश्मीरमधील नागरिकांच्या विकासासाठीही कटीबद्ध आहेत. मोदींनी सप्टेंबर, २०१८ मध्ये देशात 'आयुष्यमान भारत' योजना जाहीर करुन ती लागू केली होती. आता २६ महिन्यांनंतर ही योजना जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर ही योजना या प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे. 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सेहत' या नावाने ही योजना राबवली जाईल. आज व्हिडीओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी ही योजना जम्मू काश्मीरमध्ये लागू होणार असल्याची घोषणा केली. यावेळी गृहमंत्री अमित शाह आणि राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी जम्मू- काश्मीरमधील नागरिकांशी संवाद साधला. 
 
 
'सेहत' योजनेअतंर्गत जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्य विमा कवच उपलब्ध करुन देण्यात येईल. जवळपास ५ लाख रुपयांचे हे आरोग्य विमा कवच असेल. याचा फायदा जम्मू काश्मीरमधील १५ लाख कुटुंबांना होईल. म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जम्मू काश्मीरमधील नागरिक मोफत ५ लाखांपर्यंत उपचार करु शकतात. या योजनेचा लाभ देशात कुठेही घेता येईल. प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना लागू असणाऱ्या रुग्णालयांमध्ये ही योजना उपलब्ध असेल. 

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121