प्रताप सरनाईक यांचा भाजपतर्फे निषेध

    14-Dec-2020
Total Views | 193

BJP_1  H x W: 0


 
कल्याण : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे आज कल्याणात पडसाद उमटलेले दिसून आले. प्रताप सरनाईक हाय हाय, आघाडी सरकार हाय हाय अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी करीत भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
 
 
 
भाजप कल्याण जिल्ह्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार सरनाईक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. ईडीकडून सुरू असणाऱ्या कार्यवाहीबाबत प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देताना नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबाबत हे वक्तव्य केले. त्यांच्या निषेधार्थ कल्याणात भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात आणि विश्वासू सहकारी म्हणून तानाजी मालुसरे यांनी महाराष्ट्राला अनेक लढाई जिंकून दिल्या. त्या तानाजी मालुसरेचा अपमान प्रताप सरनाईक सारख्या मराठी माणसांनी करणे हे अत्यंत दुदैव आहे. शिवसेनेचे आमदार सरनाईक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करतात हे महाराष्ट्राचे दुदैव आहे. प्रताप सरनाईक यांच्यासारखे लोकप्रतिनिधी निवडून जाणो हे संपूर्ण महाराष्ट्राचे दुदैव आहे. तानाजी मालुसरे यांच्यासारख्या शूरवीराबाबत सरनाईक यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत निंदनीय असून त्यांच्या निषेधार्थ भाजपतर्फे हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121