पुणे विद्यापीठावर अनागोंदी कारभाराचा आरोप ; अभाविपचे आंदोलन

    29-Oct-2020
Total Views | 81
 
pune university_1 &n
 
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काराभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने गुरुवारी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये आंदोलन करण्यात आले. गेल्या काही काळामध्ये पुणे विद्यापीठाशी संबंधित समस्या, विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी, प्रशासनाचा अनागोंदी कारभार या सगळ्याबाबत पुणे विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यासाठी अभाविपकडून हे आंदोलन करण्यात आले.
 
 
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा यंत्रणेतून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा पेपर गायब होणे. तसेच, ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाच्या परीक्षा पार पडत असताना यामध्ये विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे १४ हजार पेक्षा अधिक तक्रारी उपलब्ध झालेल्या असून, त्यावर काय उपाययोजना करणार याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले नाही.
 
 
बीए, एलएलबी अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ पूर्वी देण्यात येणारी बीएची पदवी मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. तसेच, अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरून उत्तीर्ण केले जाणर आहे, असे प्रशासन सांगत आहे. परंतु, अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय का घेत आहे, अशा अनेक समस्यांबाबत अभाविपने हे आंदोलन केले आहे. मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये अभाविपचे विद्यार्थीं कार्यकर्त्यांनी ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा धिक्कार केला. तसेच जोपर्यत मागण्या मान्य होत नाही तोपर्यत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा अभाविपने दिला आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121