देणे समाजाचे फेडूया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2020
Total Views |

dd_1  H x W: 0



यावर्षी गणपतीला पेढे-लाडूऐवजी शैक्षणिक साहित्य म्हणून प्रसाद आणावा,’ या ‘ओंकार’च्या आवाहनाला घरी येणार्‍या आप्तेष्ट मंडळींनी भरभरून प्रतिसाद दिला आणि येथूनच आमच्या उपक्रमाला सुरुवात झाली, असं म्हणायला हरकत नाही. खरंतर या आधी चार-पाच वर्षांपासून नॅशनल पार्कच्या चिंचपाडा अंगणवाडीत मी आणि माझा मुलगा ओंकार अधूनमधून तेथील मुलांना मदत घेऊन जात असायचो. कधी ही मदत कपड्याच्या स्वरूपात कधी शैक्षणिक साहित्य तरी कधी पुस्तक या स्वरूपात असायची. त्यांना तेथे काही गरज लागली की, नितेश किंवा पूजा हक्काने फोन करत. “मावशी व्यापाराची पुस्तकं हवी आहेत किंवा वह्या हव्या आहेत. या वर्षी वाड्यातील शाळेच्या मुलांनाही मदत करा,” या वाड्यातील शिक्षक प्रल्हाद सरांशी त्यानिमित्ताने ओळख झाली. आमच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला.


गणपतीनंतर आमची टीम म्हणजेच मी
, ओंकार, संपदा, हेलेना आम्ही ‘बालिवली’ आणि ‘मोज’ या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तिथे गेल्यावर त्यांना अजून कोणत्या घटकांची गरज आहे, त्याची जाणीव झाली आणि दुसर्‍या भेटीत आम्ही त्या रोज लागणार्‍या वस्तूंचे वाटप केले. फणी, कांगावा, हेअर बँड, रुमाल, सुई, दोरा, बटण, हूक, साबण... या वेळी ‘बालिवली’ आणि ‘मोज’ शाळा तर केल्या पण त्या वेळी लक्षात आले की, या परिसरातील अजून काही शाळा आपण करू शकू. त्यांनाही या मदतीची गरज आहे. प्रल्हाद सरांची या कामी आम्हाला, मोलाचे सहकार्य मिळते आहे. त्यांनी गवतेपाडा, कोलीम सरोवर आणि अतिदुर्गम भागातील निहाळी शाळेचा हजेरी पट किती आहे, याची माहिती दिली. प्रत्येक वेळी आम्हाला येणार अनुभव खूप काही शिकवून आणि अधिक नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्सहित करतो आहे. आमच्या या उपक्रमाला समाजातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एवढेच नाही तर या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होणार्‍यांची संख्याही आता वाढते आहे.


यापुढे भेटवस्तू म्हणून गोष्टींची पुस्तक
, कपडे त्याच बरोबर तेथील मुलांसाठी क्रीडा मार्गदर्शन करता यावे याचाही विचार करीत आहोत. येथील मुलांचा शहरातील मुलांशी संवाद होईल यासाठी आम्ही शिबिराचे आयोजन करणार आहोत. शहरातल्या मुलांसाठी गावातील अनुभव, शेताची माहिती, आकाश दर्शन यांसारखे उपक्रमही या आयोजनामध्ये असणार आहेत. ओंकार येथील शिक्षकांना सोशल मीडियावर प्रशिक्षण देत आहे, जेणेकरून शिक्षकही आपल्या शाळेतील नवनवीन उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवतील. माझ्याबरोबर आजची तरुण पिढी ही या उपक्रमात सहभागी होते आहे याचा आनंद आणि समाधान आहे.
(या उपक्रमात ज्यांना हातभार लावायचा आहे, त्यांनी पूर्णिमा नार्वेकर ९८२०००३८३४, ओंकार नार्वेकर ९८२०२१८३४४ यांना संपर्क करावा.)


- पूर्णिमा नार्वेकर

@@AUTHORINFO_V1@@