'बीबीएन पीसीएमसी'तर्फे संजीव पेंढरकर यांचा सत्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Sep-2019
Total Views |

 


पुणे : 'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन ग्रुप' हा ब्राह्मण समाजातील उद्योजकांसाठी कार्यरत आहे. 'बीबीएन' हे एक 'ब्राह्मण बिझनेस नेटवर्क' असून ब्राह्मण उद्योजकांच्या संस्थांना यशाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी साहाय्य करते. 'बीबीएन'ला ब्राह्मण व्यावसायिक समुदायामध्ये एक मानाचे स्थान आहे.

 

यातील सदस्य हे त्यांच्या व्यवसाय कुशलतेसाठी, समर्पणासाठी आणि एकमेकांबद्दल असणार्‍या प्रामाणिकपणासाठी ओळखले जातात. संजीव पेंढरकर यांना प्रेरणादायी विचार मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या सोहळ्यात साडे तिनशेहून अधिक सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती, ज्यांचे विविध क्षेत्रात व्यवसाय सुरू आहेत.

 

राम साठे यांनी अ‍ॅण्ड्रॉईड फोनसाठी विकसित केलेल्या दास-वाणी या गुगल अ‍ॅपची सर्वांना माहिती दिली आणि ज्यांना ते डाऊनलोड करायचे होते, त्यांना त्याची सोपी पद्धतही समजावून सांगितली. साठे यांनी 'मनाचे श्लोक आणि व्यवसाय' यामधील संबंध स्पष्ट केला. पेंढरकर यांनी परदेशातील विविध सुपर मार्केट्स आणि हायपर मार्केट्समध्ये 'विको'ची उत्पादने उपलब्ध करताना त्यांना किती समस्यांना तोंड द्यावे लागले, याची उदाहरणे दिली.

@@AUTHORINFO_V1@@