प्रियांका आणि राजकुमार नेटफ्लिक्सच्या 'या' सिरीजमध्ये झळकणार

    24-Sep-2019
Total Views | 30


४० वा मॅन बुकर पुरस्कार मिळालेल्या अरविंद अदिगा लिखित 'द व्हाईट टायगर' या नॉवेलचे रूपांतर नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल सिरीजमध्ये करण्यात येणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चित्रपट सृष्टीत याविषयी बरीच चर्चा देखील होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सिरीजसाठी प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

प्रियांका चोप्राने या सीरिजच्या शुटिंगविषयी माहिती देताना सिरीजच्या संहिता वाचनादरम्यानचा एक छोटासा व्हिडीओ सोशल मीडियावरून पोस्ट केला ज्याच्यामुळे प्रेक्षक याविषयी आणखी जाणून घेण्यास आता आतुरलेले आहेत. दिग्दर्शक रमीन बहरानी, राजकुमार राव आणि आदर्श गौरव या सगळ्या सहकलाकारांना टॅग करून प्रियंकाने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केला.

एका महत्वाकांक्षी चहावाल्याची ही कथा आहे. जो पुढे जाऊन एक खूप मोठा उद्योजक बनतो मात्र त्याचा हा प्रवास खूप अडचणींचा आणि घटनात्मक आहे. खून, प्रेम आणि फसवणूक अशी अनेक धोकादायक वळणे पार करून अखेर त्याचा हा प्रवास त्याला कोणत्या वाटेवर घेऊन जातो ते आपल्याला ही सिरीज पाहिल्यावर लक्षात येईल.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121