मुंबई : 'अन्नाला धर्म नसतो आणि अन्न हाच धर्म आहे' असे ट्विट करून ग्राहकांकडून कौतुकाचा वर्षाव होण्याआधीच झोमॅटोची दुटप्पी वर्तणूक ग्राहकांसमोर उघड झाली आहे. वाजिद नावाच्या एका ग्राहकाने हलाल न मिळाल्यामुळे आपल्या ऑर्डरचे पैसे परत मागितले असता झोमॅटोने त्याची माफी मागून पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आणि एकीकडे मुस्लिम डिलिव्हरी बॉय नको असे म्हणणाऱ्या ग्राहकाला धर्माची शिकवण दिली हे कितपत योग्य आहे.
गेल्या तीन दिवसांपासून झोमॅटोच्या या प्रकरणावरून सोशल मीडियावर चर्चेची झोंड उठली आहे. या प्रकारामुळे बहुतांश ग्राहक झोमॅटोवर नाराज आहेत आणि त्यांचे ऍप अनइनस्टाॅल करण्याचे आवाहन करत आहेत. धर्मनिरपेक्ष असण्याचा आव आणताना झोमॅटो मात्र दुटप्पी वागत असल्याचे अनेक पुरावे त्यांच्याच ग्राहकांनी पुराव्यांसकट उघड केले आहेत. मग त्यामध्ये झोमॅटोने परतफेड न केलेल्या पैशांची बिल आहेत, चुकीची ऑर्डर देऊनही पैसे परत न केल्याचे पुरावे आहेत, झोमॅटो चॅट मध्ये त्यांनी अनेक वेळा ग्राहकांची दिशाभूल केल्याचे देखील दिसत आहे.
#ZomatoExposed #Zomato please explain the difference (except for delivery charge) between your catalog price and an original restaurant bill of the same dish, same portion from the same restaurant.
— Sanghamitra Sengupta (@SanghamitraSen9) August 1, 2019
Thanks for playing with our trust in the name of something as essential as food! pic.twitter.com/LS8zPayXiu
दरम्यान याप्रकरणी ग्राहक काय भूमिका घेतात? ट्विटरवर सुरु असलेला 'अनइनस्टाॅल झोमॅटो' हा ट्रेंड आता काय वळण घेतो हे पाहणे महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष असल्याचा मोठेपणा मिरवणाऱ्या झोमॅटोला या सगळ्याचा फटका बसतो का? हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे असेल.