कर्नाटक : १४ बंडखोर आमदार अपात्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jul-2019
Total Views |
 


बंगळुरू : कर्नाटकात भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष के. रमेशकुमार यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण १४ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहेकाँग्रेस-जेडीएसच्या एकूण १६ आमदारांनी व एका अपक्ष आमदाराने बंडखोरी करत आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले. त्यानंतर एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार अल्पमतात येऊन कोसळले. त्यानंतर भाजप नेते व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.


दरम्यान, विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी राजीनामे स्वीकारण्यास विलंब केला. त्यामुळे राजीनामा प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. नुकतेच रमेशकुमार यांनी ३ आमदारांना अपात्र घोषित केले होते. त्यानंतर आता १४ आमदारांवर ही कारवाई करण्यात आली असून हे आमदार आता त्यांच्या मतदारसंघांची पोटनिवडणूक लढू शकणार नाहीत. तथापि, २०२३ पूर्वी, म्हणजेच विद्यमान विधानसभा मुदतपूर्व विसर्जित झाल्यास त्यांना निवडणूक लढता येईल.

 

सदर १७ आमदार अपात्र ठरल्याने कर्नाटक विधानसभेतील सदस्यांची संख्या २०१७ वर आली आहे. यामुळे सभागृहातील बहुमताचा आकडा १०४ पर्यंत आला आहे. दरम्यान, सोमवार, दि. २९ जुलै रोजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. भाजपचे राज्यात १०५ आमदार आहेत. त्यामुळे सभागृहात भाजपचे बहुमत सिद्ध होईल, असाच होरा राज्याच्या राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे.

 

बहुमत सिद्ध करू : येडियुरप्पा

कर्नाटक विधानसभेत सोमवारी आम्ही आमचे बहुमत १०० टक्के सिद्ध करू,” असा विश्वास मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. तसेच, “यापूर्वी कुमारस्वामी सरकारने आणलेले अर्थविधेयक कोणत्याही बदलाशिवाय भाजप सरकार विधानसभेत मांडेल,” असेही येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.

 

.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@