आरबीआयच्या अॅपद्वारे नेत्रहिनही सहज ओळखणार नोट

    14-Jul-2019
Total Views | 53


 

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बॅंकेतर्फे दृष्टीबाधितांना नोटांची ओळख सहज व्हावी यासाठी एका अॅप्लिकेशनची मदत होणार आहे. आरबीआयने रोकड व्यवहार समोर ठेवत हे पाऊल उचलले आहे. सध्या बाजारात १०, २०, ५०, १००, २००, ५०० आणि दोन हजारांच्या नोटा चलनात आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्यामते, नेत्रहीन व्यक्तींसाठी नोटांची ओळख सुलभ व्हावी यासाठी ठोस उपाययोजनांची आवश्यकता होती.

 

सध्या बाजारात चलनात असलेल्या नोटांवर इंटाग्लिओ प्रिंटींग देण्यात आले आहे. शंभर आणि त्यावरील नोटांवर हे चिन्ह असून २०१६ मध्ये नोटाबंदी झाल्यानंतर नव्या नोटांवर पाचशे आणि हजाराच्या नोटांवर नव्याने हे प्रिंटींग देण्यात आसलले होते. नव्या अॅपमध्ये नोटेचा फोटो काढल्यास त्याची किंमत सांगितली जाणार आहे, असे अॅप विकसित करण्यासाठी आरबीआय प्रयत्नशील आहे.

 

महात्मा गांधींची प्रतिमा असलेल्या नोटांची ओळख याद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी व्यक्तीला अॅपमध्ये नोटेचा फोटो टाकावा लागणार आहे. अॅपमध्ये फोटो काढल्यानंतर एका ध्वनीफितीद्वारे ही माहीती दिली जाणार आहे. जर तसे करण्यास अडथळा आल्यास पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. याचा फायदा देशभरातील ८० लाख नेत्रहीनांना होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121