‘सामर्थ्याच्या उपासनेला मानवतेचा स्पर्श म्हणजे हिंदुत्व’

    23-Jun-2019
Total Views | 53



पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान डॉ. अशोकराव कुकडे यांचे प्रतिपादन

 

ठाणे :हिंदुत्व सामर्थ्याची उपासना करत आले आहे. अर्थात, या उपासनेला मानवतेचा स्पर्श आहे. आत्मविस्मृतीत रमलेला हिंदु आता कुठे बाहेर पडू लागला आहे. परिवर्तनाची पहाट सुरू झाली असली तरी त्याचा भक्कम विस्तार करण्याची गरज आहे. त्यासाठी संघटनेचे काम तीव्रतेने करत राहा,” असे आवाहन ‘पद्मविभूषण’ अशोकराव कुकडे यांनी येथे केले. ‘परममित्र प्रकाशन’ व ‘दीनदयाळ प्रेरणा केंद्रा’च्यावतीने अरूण करमरकर अनुवादीत रविकुमार अय्यर लिखित पुस्तकाचे प्रकाशन येथील सहयोग मंदिर सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

 

“विवेकानंद, मॅक्सम्युलर, पॉल ब्रटनसह लाखो महनीय लोकांनी हिंदुत्वाची शक्ती ओळखली हिंदूसंस्कृतीच्या सर्वव्यापी स्वरूपाचे महत्त्व ओळखले होते. हिंदुत्वाचा विचार जगासमोर मांडल्यानंतर या विचाराला उपयोजनात आणण्यासाठी संघटन उभे राहिले पाहिजे, ही गरज डॉ. हेडगेवार यांनी ओळखून अभ्युदय असे संघटन उभे केले. आता संघाच्या मेहनतीला यश येत आहे. परिवर्तनाची सुरुवात होत आहे, पण हे परिवर्तन टिकवण्यासाठी हिंदू संघटन व त्यांच्या विस्ताराच्या कामात स्वत:ला गढून घेण्याची गरज आहे. कारण, हिंदुत्व टिकले तर लोकशाही व मानवता टिकेल. सामसर्थ्याची उपासना करण्याऱ्या हिंदुत्वाला मानवतेचा स्पर्श आहे,” असे कुकडे यावेळी म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121