नवी दिल्ली : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर केला आहे. १२ वीच्या निकालाप्रमाणेच सीबीएसई सरप्राईझ देत आज दुपारी २ वाजता अचानक निकाल जाहीर केला. या परीक्षेत सिद्धांत पेंगोरिया हा देशात पहिला आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पास होण्याचे प्रमाण वाढले असून यंदाचा ९१.१ टक्के निकाल लागला आहे. यात १३ विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ गुण मिळाले असून २४ विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९८ गुण मिळाले आहेत.
निकाल घोषित करण्याविषयी सीबीएसईने विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. आज दुपारी ३ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, असे सीबीएसईतर्फे सांगण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र, दुपारी तीन वाजता निकाल जाहीर न करता दोन वाजताच निकाल जाहीर करण्यात आला.
स्मृती इराणी यांच्या मुलीनेही यंदा दहावीची परीक्षा दिली होती, तिला ८२ टक्के मार्क्स मिळाले. दरम्यान, www.cbse.nic.in या सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात. तसेच cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat