आता कार बुक करा पेटीएम मॉलवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-May-2019
Total Views |




मुंबई : पेटीएम ईकॉमर्स प्रा. लि. च्या मालकीच्या पेटीएम मॉलने भारतातील पहिल्या क्रमांकाचा यूरोपियन ऑटोमोटिव्ह ब्रॅंड रेनोसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. याद्वारे पेटीएम मॉलच्या ग्राहकांना आणि संभाव्य कार खरेदीदारांना आपल्या पसंतीची रेनो कार ऑनलाइन आरक्षित करता येईल. ही भागीदारी भारतात उपलब्ध असलेल्या आघाडीच्या रेनो कार्सना लागू आहे. यामध्ये क्विड, डस्टर आणि कॅप्चरचा समावेश आहे.

 

पेटीएम मॉलने एक डिजिटल एक्स्पिरियन्स झोन देखील सुरू केला आहे, ज्यामुळे रेनोच्या ग्राहकांना खरेदी करणे सोपे होईल. ग्राहक पेटीएम मॉलवर लॉगऑन करून आपल्या पसंतीची रेनो इंडिया गाडी निवडू शकतात. वाहन शोधण्यासाठी ते कारचा प्रकार आणि संबंधित स्थानिक डीलर निवडू शकतात. पेटीएम मॉलच्या ग्राहकांना १०००० रु टोकन रक्कम भरून बुकिंगची पुष्टी करावी लागेल. त्यानंतर ते त्यांच्या पसंतीच्या डीलरकडे जाऊन बाकीच्या औपचारिकता पूर्ण करू शकतील व पेमेंट करून कार घेऊन येऊ शकतील.

 

पेटीएम मॉलचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्रीनिवास मोथे म्हणाले, “आमच्या मंचावरून कार बुकिंगची सुरुवात करताना रेनोशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. रेनो हा एक अत्यंत झपाट्याने वृद्धिंगत होत असलेला ऑटोमोटिव्ह ब्रॅंड आहे आणि त्यांच्या कार त्यांच्या अनोख्या स्टाइलबद्दल प्रसिद्ध आहेत आणि त्या भारतातील कारप्रेमींमध्ये लोकप्रिय आहेत. रेनो इंडियाशी आम्ही केलेल्या भागीदारीमुळे देशभरातील आमच्या ग्राहकांना कार बुकिंग करणे सोयीचे होईल. ते आता आपल्या घरी किंवा ऑफिसात बसून कोणत्याही वेळी विविध कार्सचा शोध घेऊन, त्यांची तुलना करून आपली आवडती कार आरक्षित देखील करू शकतील.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@