पुरस्कार वापसी गँगवर मोदींचा हल्लाबोल

    12-May-2019
Total Views | 153



गाझीपूर : मोदी सरकारच्या काळात देशात असहिष्णुता वाढल्याचे सांगत अनेकांनी पुरस्कार वापसी केली होती. याच पुरस्कार वापसी करणाऱ्या व्यक्तींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे झालेल्या प्रचारसभेत तोफ डागली. राजस्थानमधील अलवर येथे घडलेल्या सामूहिक बलात्कारकांडावर 'पुरस्कार वापसी गँग' गप्प का आहे?, असा परखड सवाल मोदींनी विचारला.

 

केंद्रीय मंत्री मनोज कुमार सिन्हा यांच्या प्रचार सभेत मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी राजस्थामधील काँग्रेस सरकारवरही हल्लाबोल केला. आरोपींना पकडण्याऐवजी काँग्रेस या दुःखद घटनेचे राजकारण करत आहे. निवडणुकीच्या काळात मतांवर परिणाम नको म्हणून काँग्रेसने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही यावेळी मोदींनी केला. पाच वर्षांच्या काळात आमच्या सरकारने महिलांना मानसन्मान, आदर दिला. मात्र हे काँग्रेस महिलांचा अपमान करत असल्याचे अलवर घटनेवरून दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

 

काय आहे घटना?

 

२६ एप्रिल रोजी थानागाजी-अलवर रोडवरून जाणाऱ्या एका विवाहित जोडप्याला काही तरुणांच्या घोळक्याने अडवून निर्जनस्थळी नेले. त्यानंतर महिलेच्या पतीला मारहाण करून या तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी या आरोपींनी या घटनेचा एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. यानंतर १२ दिवसांनी पोलिसांनी या आरोपींचा अटक केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121