'हे' फोटो शेअर करत असाल तर सावधान ; सीआरपीएफ

    17-Feb-2019
Total Views | 746


 


नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. सर्व नागरिकांनी रस्त्यावर येऊन या हल्ल्याचा निषेध केला. कुठे पाकिस्तानचे झेंडे जाळले गेले, घोषणाबाजी करण्यात आली तर कुठे श्रद्धांजली सभा झाल्या. अशीच लाट सोशल मीडियावरसुद्धा दिसून आली.

 

लोकांकडून अनेक भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या जाऊ लागल्या. त्यातच पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या देहांचे छिन्नविच्छिन्न अवशेष' अशा स्वरूपात काही बनावट छायाचित्रे पसरविली जात आहेत. काही समाजकंटकांकडून ही पोस्ट फिरवली जात आहे त्यापासून सावध राहावे, असे सीआरपीएफ सल्लागार मंडळाने कळविले आहे.

 
 
 

"काही लोकांकडून जवानांच्या शरिराच्या वेगवेगळ्या भागाचे खोटे फोटो पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा कोणत्याही पोस्ट्स लाईक अथवा शेअर करू नका. कोणी असे करत असेल तर संबंधित पोस्टची webpro@crpf.gov.in इथे तक्रार करा." असे सीआरपीएफच्या ट्विटर हँडलवर सांगण्यात आले आहे.

 

काही समाजकंटकांकडून आक्षेपार्ह मजकूर पसरवून जनतेत एकमेकांविषयी क्षोभ आणि अविश्वास निर्माण करण्याचे कारस्थान करण्यात येत आहे. सध्या सर्व देशवासियांनी एकत्र आले पाहिजे, अशी परिस्थिती देशासमोर ठाकली आहे. सर्वांनी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा. तसेच, अशा प्रकारचे फोटो, पोस्टस शेअर, लाईक करू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121