टीएमएतर्फे रावरणा केशवराव सभागृहाचे उदघाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2019
Total Views |

 

 
 
 
 
ठाणे : भारतीय औद्योगिक संस्था ठाणे मॅन्युफॅक्चरींग असोसिएशनचे अध्यक्ष भालचंद्रसिंह रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या रावराणा केशवराव सभागृहाचा उद्घाटन सोहळा ठाण्यातील टीएमए हाऊसमध्ये बुधवार, दि. १३ फ्रेब्रुवारी सायंकाळी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्य अतिरिक्त सचिव प्रमुख पाहुणे मुंबईचे माजी आयुक्त करुण श्रीवास्तव आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (उपकुलपती) व्हाईस चान्सलर प्रा. जी. डी. यादव उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रात असाधारण कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीं आणि सामाजिक संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला. टीएमएतर्फे रावराणा केशवराव यांच्या कार्य व स्मृतींना उजाळा देण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रावरणा केशवराव सभागृहाचे उदघाटन करण्यात आले.
 

करुण श्रीवास्तव म्हणाले टीएमए आणि आमचे गेल्या पन्नास वर्षांपासूनचे संबंध असल्याचे सांगत करुण श्रीवास्तव यांनी केशवराव यांच्या कार्यशालीची आठवण करून दिली. वयाच्या ८० वयापर्यंत त्यांनी असोसिएशनचा कारभार विविध पदांसाह सांभाळला. ज्या काळात ठाणे शहराचा विकास व्हायचा होता त्या काळात औद्योगिक संघटनेसह काम करणे मोठे आव्हान होते ते केशवराव यांनी स्वीकारत सर्व सामस्या मार्ग काढला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

यावेळी रॉबीन हुड आर्मी या स्वयंसेवी संस्थेच्या सहसंस्थापक आरुशी बत्रा यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. रॉबिनहूड आर्मीच्या कार्याबद्दल माहिती देताना आरुषी बत्रा म्हणाल्या की रॉबिनहूड आर्मी ही कोणतीही राजकीय किंवा औद्दयोगिक संस्थेशी जोडलेली संस्था नाही. जिथे जिथे भुकेला माणूस त्याच्या जेवणाची वाट पाहत असतो आणि त्याला ते कधी मिळेल याची माहिती त्याला नसते अशा निराधारांना अन्न पुरवण्याचे काम करते. सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणातून राहिलेले जेवण भुकेलेल्याकडे पोहोचवणे हे काम रॉबिन हूड आर्मी करत असल्याची माहिती त्यांनी दिली. टीएमएने केलेल्या गौरवाबद्दल संस्थेचे त्यांनी आभार मानले.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@