भारताच्या 'या' मातेने मिळवला बुद्धिबळातील वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2019
Total Views |


asfsf_1  H x W:


नवी दिल्ली : मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या कोनेरू हंपीने जिंकले. हम्पीने आर्मागेडॉन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यात ली टिंगजीचा पराभव केला. प्लेऑफच्या माध्यमातून विजेत्याचा निर्णय घेण्यात आला. काही कारणास्तव मुलाच्या जन्मानंतर त्यांनी २ वर्ष ब्रेक घेतला होता. परंतु, त्यानंतर सराव आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी पुनरागमन करताच हा बहुमान पटकावला.

 

हंपीने १२ फेऱ्यांची रॅपिड चॅम्पियनशिप जिंकून हा ऐतिहासिक यशाचा बहुमान पटकावला आहे. यादरम्यान, ३२ वर्षीय हम्पीने १२ राऊंडच्या या चॅम्पियनशिपमधील सात फेऱ्यात शानदार विजयाची नोंद केली. आता काेनेरू हंपी ही विश्वनाथन आनंदनंतर भारतामधील दुसरी वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळपटू ठरली. तिने वयाच्या ३२ व्या वर्षी भारताची पहिली महिला वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा इतिहास रचला. याच स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर द्राेणावल्ली हरिका ही १३ व्या स्थानावर राहिली. या स्पर्धेतील कोनेरू हम्पीची कामगिरी काैतुकास्पद ठरली. तिने या स्पर्धेच्या सात फेऱ्यामध्ये चुरशीची खेळी करताना अव्वल चालीच्या बळावर विजयाची नाेंद केली. हीच लय कायम ठेवल्याने तिला या विक्रमी यशाचा पल्ला गाठता आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@