२०२०मधील कायदा-सुव्यवस्था व सुरक्षेची आव्हाने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2019
Total Views |


security_1  H x



नागरिकांच्या सुरक्षेची जितकी जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची आहे
, तितकीच ती खुद्द नागरिकांचीही आहे. त्यामुळे सरत्या वर्षातील घटनांमधून धडा घेऊन नागरिकांनी आपल्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेण्यासाठी काय करता येईल, याची माहिती देणारा हा लेख...



महाराष्ट्रातील जवळ जवळ ५०टक्के भागात शहरीकरण झाले आहे
. मुंबईची लोकसंख्या व मुंबईत व्यवसायानिमित्त येणारे धरून ही संख्या दीड कोटींच्या आसपास आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या तपासातून लक्षात येते की, असे हल्ले बाहेरील तीन ते चार देशातून आखले गेले होते व त्यात काही स्थानिक लोकांचा समावेश होऊन ही भ्याड कृत्ये करण्यात आली. मादक पदार्थांची तस्करी करणार्‍यांचा, शस्त्रे व दारुगोळा उपलब्ध करून देण्यामध्ये मोठा भाग आहे व यात हातभार लावण्यासाठी स्थानिक गुन्हेगार मोठ्या प्रमाणात वापरले जातात. काही विशिष्ट धर्मातील लोकांचाही यात वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक कारणांमुळे असलेल्या स्थानिक असंतोषाचा गैरफायदा घेणार्‍या काही प्रवृत्ती त्याला खत पाणी घालून त्या समस्यांना अक्राळविक्राळ स्वरूप देतात.



ही परिस्थिती
, वाढणारे आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे, योग्य काळजी न घेतल्याने होणारी लूटमार, चोर्‍या, स्त्रियांविरुद्धचे गुन्हे, वृद्धांविरुद्ध होणारे गुन्हे, वैयक्तिक कारणांमुळे होणारे खून, मारामार्‍या यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये सतत भीती निर्माण करत असतात. याशिवाय वाहतुकीचे नियम पाळले न जाण्यामुळे होणारे अपघात व वाढत्या वाहनांमुळे तसेच अनेक कारणांसाठी जसे मोर्चे, निदर्शने, मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम यामुळे होणारी वाहतूककोंडी व दिरंगाई सर्वांचाच रक्तदाब वाढवत असते. यावर उपाय म्हणून सुरक्षा यंत्रणांनी मोठ्याप्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. ठिकठिकाणी लावण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा, अत्याधुनिक शस्त्रे, वाहने, वायरलेस यंत्रणा, ड्रोन्स, बोटी व या सर्व गोष्टी वापरण्याचे प्रशिक्षण या गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘११२’ हा राष्ट्रीय आणीबाणी क्रमांक आज प्रत्येकाला त्याच्या स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड करण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.



त्यातून पोलीस
, आग, वैद्यकीय अथवा अन्य कोणतीही तातडीने लागणारी मदत फक्त टॅप करून तुम्ही जेथे असाल तेथे उपलब्ध केली जाते. त्यामुळे प्रत्येकाने ‘११२ INDIA’ हे अ‍ॅप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करावे व आपण कोठे आहोत हे सुरक्षा यंत्रणेस कळण्यास परवानगी द्यावी. याशिवाय रिझर्व्ह बँकेने वारंवार दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी व आपला ओटीपी आणि पीन क्रमांक कोणालाही सांगू नये. सायबर सिक्युरिटीसाठी आपली तक्रार तातडीने cyberpst-mummahapolice.gov.in वर मुंबईकरांनी कळवावी. याशिवाय उपलब्ध असलेली Bharat Interface for Payment (BHIM) हे अत्यंत सुरक्षित व वापरण्यास अत्यंत सोपे अ‍ॅप स्मार्ट फोनमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या मदतीने पैशांच्या सुरक्षेची उत्तम काळजी घेता येते व देण्याघेण्याचे सर्व व्यवहार सुलभतेने करता येतात.



वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे तसेच कोणत्याही कारणासाठी वाहतुकीस अडथळा होईल किंवा रस्ते वापरता येणार नाहीत असे प्रकार कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे
. इंटरनेटच्या माध्यमातून तसेच चित्रपट, टीव्हीवरील मालिकांमुळेे मोठ्या प्रमाणात लहान वयातच मुले लैंगिक अत्याचार आणि हिंसेला प्रवृत्त होत आहेत. ‘पब्जी’सारख्या व्हिडिओ गेम्समुळे मुलांमधील आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. यासाठी पालकांनी मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ देऊन मुले या धोक्यांपासून दूर राहतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. काही वर्षांपूर्वी आझाद मैदान या ठिकाणी हिंसक मोर्चाने पोलिसांवर हल्ला केला होता. तपासाअंती आढळले की, सोशल मीडियातून प्राप्त खोट्या व्हिडिओमुळे निदर्शक चिडले होते. सोशल मीडियाचा वापर करून अर्बन नक्षलवादी तसेच इतर अनेक जण दुष्ट हेतू मनात ठेऊन अफवा पसरवितात. त्यामुळे सोशल मीडियाच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणे आवश्यक आहे, म्हणजे अपप्रचारामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात येणार नाही.


- प्रवीण दीक्षित 
(लेखक निवृत्त पोलीस महासंचालक आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@