आता धोणी झळकणार छोट्या पडद्यावर?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोणी मैदानापासून काही वेळापासून लांब आहे. परंतु, आता धोणी एका वेगळ्या रूपामध्ये चाहत्यांसमोर येणार आहे. भारताचा माजी कर्णधार आता एक नवीन मालिका छोट्या पाड्यावर घेऊन येणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, धोनी या मालिकेद्वारे लष्करी अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.

 

एका निर्मीती कंपनीसोबत धोनी या मालिकेची निर्मिती करणार आहे. परमवीरचक्र व अशोकचक्र विजेत्या पराक्रमी जवानांच्या यशोगाथा या मालिकेतून सांगण्यात येणार आहे. सध्या भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल (मानद) पदावर धोनी कार्यरत आहे. धोणी २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर काही काळासाठी क्रिकेटपासून लांब आहे. धोनीने विश्वकरंडक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुध्दच्या सामन्यानंतर एकही क्रिकेटचा सामना खेळलेला नाही. भारतीय संघाने विश्वकरंडक स्पर्धेनंतर तीन देशांविरुध्द मालिका खेळल्या आहेत. धोनीने वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुध्दच्या मालिकांमधून माघार घेतली होती.

@@AUTHORINFO_V1@@