बालाकोट पुन्हा सक्रिय आतंकवादाचे केंद्र : केंद्रीय गृहमंत्रालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |





नवी दिल्ली
: पाकव्याप्त कश्मीर(पीओके)मधील बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी तळ सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्रालयाने ही माहिती बुधवारी राज्यसभेत दिली. गृहमंत्रालयाने राज्यसभेत लिखित स्वरूपात माहिती दिली कि, गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार बालाकोटमध्ये पुन्हा एकदा आतंकवादी तळे कार्यरत झाली आहेत. या दहशतवादी संघटनाच्या माध्यमातून धार्मिक आणि जिहादी शैक्षणिक पाठ्यक्रम पुन्हा सुरू झाले आहेत. अहमद पटेल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी हि माहिती दिली.


या उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले की
,"सरकारी गुप्तचर संघटनांकडून माहिती मिळाली कि, बालाकोटमध्ये पुन्हा आतंकवादी संघटना कार्यरत झाल्या आहेत आणि भारताच्या विरोधात धार्मिक आणि जिहादी शिक्षण पाठ्यक्रम पुन्हा चालू आहेत." त्यांनी पुढे सांगितले की,"भारत सरकारच्या सीमांच्या संरक्षणासाठी प्रतिबद्ध आहे."

@@AUTHORINFO_V1@@