मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |



मोठा गैरव्यवहार असल्याचा संशय


मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी): रस्तेघोटाळाप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून पालिकेतील कंत्राटदारांवर धाडी टाकल्या जात आहेत. मागील आठवडाभरापासून या धाडी टाकण्यात येत असून तीन दिवसांपूर्वी आरपीएस इन्फ्रा ग्रुप, वन वर्ल्ड्र टेक्‍स्टाईल ग्रुप व स्कायवे ऍण्ड रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्‍ट यांच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने धाड टाकल्यानंतर आता इंडियन इन्फोटेक अॅण्ड सोफ्टवेअर लिमिटेड या कंपनीवरही धाड टाकल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 
मुंबई महापालिकेच्या रस्ते गैरव्यवहार प्रकरणानंतर काही कंत्राटदारांचा समावेश काळ्या यादीत करण्यात आला होता. मात्र नाव बदलून त्यांनी पालिकेची रस्त्याची कंत्राटे पुन्हा मिळविली. स्थायी समितीत यावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले होते. या मोठा गैरव्यवहार असल्याच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाकडून कंत्राटदारांवर धाडी टाकण्यात येत आहेत. गुरुवारी आणखी एका कंत्राटदारावर धाड टाकण्यात आल्याने त्यांची धावपळ उडाली आहे. या प्रकरणातील आरपीएस इन्फ्रा ग्रुप व रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्‍ट यांचा समावेश मुंबई महापालिकेने काळ्या यादीत केला होता. २०१७ मध्ये झालेल्या सुमारे ३५० कोटींच्या रस्ते गैरव्यवहारानंतर महापालिकेने काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते. दरम्यान, या प्रकरणात मोठ्या प्रमाणात प्राप्तिकर बुडवण्यात आल्याचा संशय असून त्याच्या तपासणीसाठी ही शोधमोहीम राबवण्यात आली आहे. आमच्याकडील नोंदी व कागदोपत्री नोंदी यांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे सध्या प्राथमिक स्थितीत या गैरव्यवहाराची व्याप्ती किती मोठी आहे, हे सांगणे शक्‍य होणार नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
@@AUTHORINFO_V1@@