डोंबिवलीतील फेरीवाला अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांचा
एक दिवसाचा पगार कट
डोंबिवली(प्रतिनिधी): निवडणुका असल्याने काम जास्त असल्याची सबब पुढे करत कामात आळशीपणा करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा रेल्वे पूल दुरूस्तीसाठी बंद केल्याने डोंबिवलीकरांना वळण घेऊन मधल्या पुलावरून स्कायवॉकवर यावे लागते. मात्र स्कायवॉकवर आल्यावर फेरीवाल्यांचा दोन्ही बाजूने घोळका पाहून नागरिक पालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत आहेत.या फेरीवाल्यांना हटवण्याचे सोडून पालिका कर्मचारी गप्पा मारत उभे असतात.त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला हे कर्मचारी जबाबदार आल्याचा ठपका ठेवत त्याचा एका दिवसाचा पगार कट होणार आहे.तसे पत्र प्रभाग क्षेत्र अधिकारी उपयुक्तांना देणार आहेत.
पालिकेच्या स्कायवॉकवर काही दिवसांपासून फेरीवाले बसत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.त्यात भिकारी, गर्दुल्ले यांनीही स्कायवॉकवर बस्तान मांडले आहे.पालिकेचे फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामाचा बोजा असल्याने किती काम करणार अशी सबब पुढे करत आहेत.नागरिकांनी याबाबत पालिकेच्या कामकाजावर बोट दाखवले असल्याने पालिकेने कर्मचाऱ्यांना त्याचा एका दिवसाचा पगार कट करण्याचा निर्णय घेतला आहे.तसे पत्र प्रभाग क्षेत्र अधिकारी उपायुक्तांकडे देणार आहेत उपायुक्तांनी अश्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलिकर करत आहेत.तर डोंबिवलीतील 'ग' प्रभाग क्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप आणि 'फ'प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांचेही अश्या कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष नसल्याचे असे बोलले जात आहे.