आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी करू नका! : आठवले

    13-Jul-2018
Total Views | 28



 

मुंबई: “आम्हाला नक्षलवाद मान्य नाही. आंबेडकरी चळवळ ही आक्रमक आहे. या चळवळीला आक्रमक करताना नक्षलवादाचा मार्ग दाखवू नका. आंबेडकरी चळवळीचा मूळ विचार अहिंसेचा, गौतम बुद्धांचा आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीला आंबेडकरी चळवळच राहू द्या. तिला नक्षलवादाकडे नेऊ नका,” असे खडे बोल रिपाइं (आठवले गट)चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सुनावले.
 

घाटकोपर (पूर्व) येथील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आठवले बोलत होते. आठवले म्हणाले की, “सध्या सोशल मीडियामध्ये जे टीका करीत आहेत त्यांचे समाजात कोणतेही योगदान नाही. दोन समाजात गैरसमज पसरवून वाद लावण्याची, आंबेडकरी समाजाचे नुकसान करण्याची भूमिका ते घेतात. व्हॉट्सअ‍ॅपवर टीका करण्याएवढे सोपे काम चळवळीचे नाही,” असे ते म्हणाले. आंबेडकरी चळवळीत काम करणे अवघड आहे. चळवळ कशी उभी करायची, ती माझ्याकडून शिका मग माझ्यावर टीका करा, ” असे आव्हानही आठवले यांनी आपल्या टीकाकारांना दिले. ”रमाबाई आंबेडकर नगरवासीय माझ्या पाठीशी उभे राहिल्यानेच माझे नेतृत्व देशभर वाढले,” अशीही कृतज्ञतेची भावना रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केली.

 

भीमा-कोरेगाव हिंसाचारानंतर आंबेडकरी चळवळीत घुसलेले नक्षलसमर्थक व आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचा त्यांनी चालवलेला प्रयत्न हा एक डोकेदुखीचा मुद्दा ठरला आहे. गेले काही दिवस हे प्रचारतंत्र पद्धतशीररित्या राबवले जात असून यामुळे समाजमन मोठ्या प्रमाणावर कलुषित होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘घरचा आहेर’ दिल्याने आता या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
पराभूत सैन्याचे

पराभूत सैन्याचे 'फिल्डमार्शल'; आधी हकालपट्टीची चर्चा, आता लष्कराच्या सर्वोच्च पदावर बढती

ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत पाकिस्तानला योग्य धडा शिकवला. या दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची पाक सरकारने हकालपट्टी केल्याची चर्चा रंगली. त्यांच्याजागी जनरल शमशाद मिर्झा यांची नवीन लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा रंगली. असीम मुनीर यांच्यावर वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप असल्याने असे करण्यात आल्याची माहिती होती. मात्र आता पाक सरकारने त्यांची फिल्डमार्शल पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात ..

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

सैफुल्लाहनंतर पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर अज्ञातांकडून हल्ला!

(Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121