'समृद्धी'वर अपघात रोखण्यासाठी इंटीलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम येणार!

"वाहने जपून चालवा," देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला आवाहन

    26-May-2023
Total Views |

Devendra Fadnavis

 
शिर्डी : समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर ता. इगतपुरी या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पार पडले. समृद्धी महामार्गावर लवकरच इंटीलिजन्ट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम बसविण्यात होणार आहे. ही यंत्रणा तातडीने बसविण्याची विनंती त्यांनी केली. याच वेळी समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांबद्दलही चिंता व्यक्त करत प्रवाशांना विनंती केली आहे.

महामार्ग दीडशे किमी प्रतितास वेगासाठी अनुकूल असा तयार करण्यात आला असला. ज्यात वाहनांना १२० किमी प्रतितास वेगाने जाण्याची परवानगी असली तरीही आपल्या सर्व गाड्या या वेगाने चालण्यायोग्य नाहीत. काहींची चाके नादुरुस्त आहेत, अपग्रेड झालेल्या नाहीत. त्यामुळे जोपर्यंत वाहतूक प्रणाली यंत्रणा या महामार्गावर बसत नाही तोवर विशेषतः रात्रीच्या वेळेस खबरदारी घ्यायला हवी. हा महामार्ग सरळ जात असल्याने चालकाला डुलगी लागण्याचे प्रमाण अधिक असते. एकदा का यंत्रणा कार्यान्वित झाली त्यानंतर अपघाताची पूर्वसूचना मिळणे शक्य होईल आणि त्यादृष्टीने पुढील कार्यवाही करणेही सोपे जाणार आहे, त्यामुळे तोवर खबरदारी घ्या, असे आवाहन फडणवीसांनी जनतेला केले आहे.
समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत जाणार : देवेंद्र फडणवीस

येत्या सहा ते आठ महिन्यांत संपूर्ण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मार्ग हा संपूर्णपणे कार्यान्वित होईल. हा महामार्ग थेट मुंबईपर्यंत जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. भविष्यात वेसाईड एमिनिटीज तयार करणार असून येत्या काळात या महामार्गावर पर्यटकही मोठ्या संख्येने येतील, असेही फडणवीस म्हणाले. मुंबई-गोवा महामार्ग, पुणे रिंगरोड, अशा भविष्यात येणाऱ्या विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. नागपूर-गोवा हा महामार्ग जेव्हा येईल तेव्हा मराठवाड्याचे चित्र बलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे-पवारांनी या मार्गाला विरोध केला!


ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते त्यावेळी महाराष्ट्राच्या समृद्धी महामार्गाला दोघांनीही जाहीर सभेत विरोध केला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.