खुशखबर! नागपुरात सीएनजी १० रुपयांनी स्वस्त

    18-Aug-2023
Total Views | 99

CNG


नागपूर :
नागपुरकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नागपुरमध्ये सीएनजीच्या दरात मोठी कपात झाली असून सीएनजीचे दर तब्बल १० रुपयांनी कमी झाले आहेत. ही नागपुरकरांसाठी मोठी खुशखबर असल्याचे बोलले जात आहे. नागपुरमध्ये १५ ऑगस्टच्या रात्रीपासून सीएनजीचे दर १० रुपयांनी कमी झाले आहेत.
 
सध्या हे दर ८९.९० रुपये प्रति किलो एवढे आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर कमी झाल्यामुळे ही घसरण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. नागपुरात ऑगस्ट २०२२ मध्ये सीएनजीचे दर ११६ रुपये प्रतिकिलो एवढे होते. त्यात घसरण होऊन ते आता ८९.९० रुपये झाले आहेत. नागपुरात एक वर्षात सीएनजीचे दर २६ रुपयांनी कमी झाले आहेत.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121