नागपूर शहरात ₹१३००कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ!

नागपूर जिल्ह्यात ₹350 कोटींच्या वीज यंत्रणा बळकटीकरणाचे काम

    10-Oct-2024
Total Views | 39

nagpur


मुंबई, दि.९ :
नागपूर येथील पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प, आयआयटीएमएस (IITMS) प्रकल्प तसेच नागपूर शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. नागपूर शहरातील ₹१३००कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन यावेळी करण्यात आले.
यावेळी आ. प्रवीण दटके, आ. आशिष जयस्वाल, आ. परिणय फुके, माजी आ. आशिष देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अमृत २.० योजनेअंतर्गत ₹७५० कोटींचा पोहरा नदी प्रकल्प हाती घेतल्याने नागपूर दक्षिण-पश्चिम आणि नागपूर दक्षिण या भागातील १००% सीवेज कव्हरेज होणार आहे. यामुळे येत्या काळात स्वच्छ आणि वाहती पोहरा नदी पाहायला मिळणार आहे. ज्या टाऊनहॉलमध्ये नगरसेवक आणि महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तो ऐतिहासिक टाऊनहॉल २५० नगरसेवकांच्या क्षमतेसह अत्याधुनिक सुविधांमध्ये बांधला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर महानगरपालिकेने ITMS प्रकल्प हाती घेतला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर या प्रकल्पामध्ये केल्याने शहरातील ट्राफिक मॅनेजमेंट आणि नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणे सोपे होणार आहे. या कार्यक्रमादरम्यान जलकुंभाचे लोकार्पण, आयुष्यमान आरोग्य मंदिराची सुरुवात, झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप आणि आशासेविकांना मोबाईलचे वाटप करण्यात आले.

नागपूर जिल्ह्यात ₹350 कोटींच्या वीज यंत्रणा बळकटीकरणाचे काम
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.मार्फत विविध कामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच विविध योजनांचे लाभ वाटप कार्यक्रम पार पडला. नागपूर महानगर क्षेत्रामध्ये वस्त्या वाढत आहेत. या सगळ्या भागाला सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज वितरण यंत्रणांचे बळकटीकरण आवश्यक आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये आपण ₹350 कोटींच्या वीज यंत्रणा बळकटीकरणाचे काम हाती घेतले आहे. उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री म्हणून काम करत असताना अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आज आपल्या राज्याची स्थापित क्षमता 40,000 मेगावॅट आहे. ही स्थापित क्षमता स्वातंत्र्योत्तर काळातली आहे, मात्र गेल्या अडीच वर्षात ऊर्जा विभागासंबंधी आपण घेतलेल्या निर्णयांमुळे या क्षमतेत आगामी 5 वर्षात 45,000 मेगावॅटपर्यंत भर पडणार आहे, त्यामुळे एकूण क्षमता 85,000 मेगावॅटपर्यंत जाणार आहे. अडीच वर्षातील विविध योजनांमुळे ऊर्जा विभागाला एक दिशा मिळाली आहे. यामुळे देशातील सर्वोत्तम ऊर्जा खाते हे आपल्या महाराष्ट्राचे होणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी आ.आशिष जयस्वाल, आ. परिणय फुके, ऊर्जा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

'केजी टू पीजी' शिक्षण एकाच छताखाली
'नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज'च्या (NMIMS) 'केजी टू पीजी' भव्य शैक्षणिक कॅम्पसचे भूमिपूजन आज नागपूर येथे करण्यात आले. यावेळी संबोधित करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जगाच्या पाठीवर त्याच देशांचा सन्मान होतो, ज्याठिकाणी शिक्षणाच्या उत्तम सुविधा असतात. मानव संसाधन तयार करणाऱ्या आयकॉनिक इन्स्टिट्यूट ज्या शहरात असतात, तेच शहर आणि तेथील लोक प्रगती करतात. म्हणूनच देशातील सर्व आयकॉनिक इन्स्टिट्यूट नागपूरमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे आज नागपूर एक प्रकारे 'शैक्षणिक केंद्र' म्हणून उदयाला येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नरसी मोनजी इन्स्टिट्यूटला जागा देण्यात आली. या जागेसंदर्भातील सर्व मान्यता राज्य शासनाने वेळेत दिल्याने आज प्रत्यक्ष भूमिपूजन होऊन काम सुरु होत आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांना 25% राखीव जागा आणि 20% फी सवलत मिळणार आहे. तसेच 'केजी टू पीजी' अशा सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध होणार आहे. देशातील सर्वात सुंदर कॅम्पस नागपूरमध्ये बनविण्याचे आश्वासन आ. अमरिशभाई पटेल यांनी दिले आहे. नरसी मोनजी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नागपूरमध्ये सर्वोत्तम दर्जाच्या शिक्षणाचे मोठे दालन सुरु होत आहे. ज्याचा फायदा नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे." यावेळी आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
अग्रलेख
जरुर वाचा

'येरे येरे पैसा ३' मधील 'उडत गेला सोन्या' हे 'जेन झी' ब्रेकअप साँग प्रदर्शित!

'येरे येरे पैसा ३' या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'उडत गेला सोन्या' प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणे एका वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सनी आणि बबलीचे गोड प्रेम प्रेक्षकांनी अनुभवले होते. परंतु आता 'येरे येरे पैसा ३' मध्ये सनीचे लग्न दुसऱ्याच मुलीशी होत असल्याने बबलीचे मन तुटले आहे. बबली तिच्या मनातील भावना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121