उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये काल वादळाने चांगलाच तडाका दिला आहे. या वादळामुळे आतापर्यंत १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे अशी बातमी सध्या मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वादळाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. भारतात उत्तर तर दक्षिण भागात अचानक वातावरण बदल झाल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना होतांना दिसत आहे.
या वादळामुळे बऱ्याच ठिकाणी जीवितहानी झाली आहे. सगळ्यात जास्त फटका उत्तर प्रदेश आणी राजस्थान या राज्यांना बसला आहे. बुधवारी रात्री अचानक या पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना या वादळाचा जोरदार फटका बसला आहे.
या वादळामुळे धान्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साठवणुकीचे धान्य जवळपास खराब झाले आहे. या पावसाने उन्हाळ्यापासून नागरिकांना जरासा दिलासा दिला असला तरी देखील या वादळामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांचा मृत्यू झाला असून या अचानक आलेल्या पावसाने सामान्य जनतेला चांगलाच फटका दिला आहे.