तपास यंत्रणा परिपूर्ण व्हाव्यात : अरुण जेटली

    04-Dec-2018
Total Views | 22
 

नवी दिल्ली : महसूल गुप्तचर विभागाने उच्च व्यावसायिक दर्जा व प्रामाणिकता राखून एक परिपूर्ण संघटना बनण्यासाठी प्रयत्न करावेत, असे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. महसूल गुप्तचर विभाग (डीआरआय)च्या ६१व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

यावेळी जेटली यांनी कर्तव्य बजावतांना मृत्युमुखी पडलेले एल. डी. अरोरा या अधिकाऱ्यांचे स्मरण केले. जेटली यांच्या हस्ते जी. एस. स्वाहिनी आणि एम. एल. वाधवान या माजी महासंचालकांना उत्कृष्ट सेवा सन्मान २०१८ने गौरवण्यात आले तसेच जेटली यांनी भारतातील चोरटा व्यापार २०१७-१८च्या दुसऱ्या अंकांचे प्रकाशन करण्यात आले.

 

तपास संस्थांनी उच्च दर्जाची व्यावसायिकता कायम राखत गुन्हे शोधणे, हा एकमेव हेतू समोर ठेवण्याची गरज आहे. कोणताही निरपराध दुखावला जाणार नाही किंवा त्याला त्रास दिला जाणार नाही, हे निश्चित करतानाच कोणीही दोषी सुटणार नाही याची खात्री बाळगणे गरजेचे आहे, असेही जेटली यांनी स्पष्ट केले. प्रसारमाध्यम किंवा बातम्यांमध्ये कमी प्रमाणात विवाद निर्माण होणे, हे त्यांच्यासाठी चांगले ठरेल, असे जेटली यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
शाळा आणि रुग्णालयाच्या बांधकामापूर्वीच ठेकेदाराला वाटले दीड कोटी

शाळा आणि रुग्णालयाच्या बांधकामापूर्वीच ठेकेदाराला वाटले दीड कोटी

बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा प्रताप; विधान परिषदेत पडसाद, निलंबनाची कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शाळा आणि रुग्णालयाच्या बांधकामापूर्वीच ठेकेदाराला दीड कोटी वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विधान परिषदेत त्याचे पडसाद उमटले असून, प्राथमिक चौकशीअंती दोषी आढळलेल्या शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत खातेनिहाय चौकशी पूर्ण करून तथ्यांनुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवार, दि. ७ जुलै रोजी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121