आंतरविद्यापीठ टे.टे. स्पर्धा: महिला स्पर्धक चमकल्या

    14-Nov-2018
Total Views | 28

बहिणाबाई चौधरी उमविच्या संघाने उदयपूर संघाचा 3-1 ने केला पराभव


जळगाव, 13 नोव्हेंबर
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस (महिला) स्पर्धेचा पहिला दिवस महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या महिला खेळाडूंनी गाजवला.
 
महाराष्ट्रातील जळगाव, नागपूर, अमरावती, सोलापूर, नांदेड, कोल्हापूर येथील विद्यापीठांनी सायंकाळपर्यंत साखळी पद्धतीच्या सामन्यात विजय प्राप्त केला.
 
13 नोव्हेंबरपासून स्पर्धांना विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.नितीन बारी, दीपक पाटील, कुलसचिव भ.भा.पाटील, प्रा.ए.बी.चौधरी, सिनेट सदस्य नितीन झाल्टे उपस्थित होते.
 
कुलगुरु म्हणाले की, गेल्या काही वर्षात भारताच्या क्रीडा क्षेत्रात महिलांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यावर्षी आशियाई स्पर्धेच्या इतिहासात भारताने प्रथमच टेबल टेनिस स्पर्धेत दोन कांस्यपदक प्राप्त केल्यामुळे टेबल टेनिस खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे. हा खेळ चपळतेची परीक्षा पाहणारा आहे.
 
स्पर्धेचे कार्याध्यक्ष दिलीप पाटील यांनी आयुष्यात निर्णय घेण्याची क्षमता खेळामुळे प्राप्त होते, असे सांगून स्पर्धेत जय-पराजयापेक्षाही सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रारंभी क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.जी.ए.उस्मानी यांनी केले. सहायक क्रीडा संचालक आर.ए.पाटील यांनी आभार मानले. यावेळी पाहुण्यांनी टेबल टेनिस खेळून स्पर्धांना प्रारंभ केला.
 
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा.एम.वाय.चव्हाण, डॉ.विजय पाटील, डॉ.पी.आर.चौधरी, डॉ.व्ही.के.पाटील, डॉ.संजय चौधरी, डॉ.प्रतिभा ढाके, प्रा.विकास महाजन, डॉ.तेजस शर्मा, डॉ.बी.आर.मोरे, डॉ.भारत चालसे, डॉ.अनिता कोल्हे, प्रा.किशोर वाघ, प्रा.हसीन तडवी, प्रा.क्रांती क्षीरसागर आदी परिश्रम घेत आहेत.
 
स्पर्धेचे निकाल
 
* हेमचंद्रचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ विरुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या झालेल्या सामन्यात नागपूर संघाने 3-1 ने विजय प्राप्त केला.
 
* महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा विरुद्ध गुजरात विद्यापीठ, कोटा यांच्यात झालेल्या सामन्यात बडोदा विद्यापीठाने 3-0 ने विजय प्राप्त केला.
 
* गोविंद गुरु आदिवासी विद्यापीठ, बनसवारा (राजस्थान) विरुद्ध राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या चुरशीच्या झालेल्या सामन्यात नागपूर विद्यापीठाने 3-0 विजय मिळविला.
 
* कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विरुद्ध मोहनलाल सुखदिया विद्यापीठ, उदयपूर यांच्यात झालेल्या सामन्यात जळगावच्या संघाने उदयपूर संघाचा 3-1 ने पराभव केला.
 
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे विरुद्ध वीरनर्मद साऊथ गुजरात विद्यापीठ, सुरत यांच्यात सुरत विद्यापीठाने 3-0 ने विजय प्राप्त केला.
 
*महाराजा कृष्णकुमारसिंहजी विद्यापीठ, भावनगर विरुद्ध एल.एन.आय.पी.ई.ग्वाल्हेर सामन्यात ग्वाल्हेर संघाने भावनगर संघावर 3-0 ने विजय प्राप्त केला.
 
*महाराजा छत्रसाल बुंंदेलखंड विद्यापीठ, छत्रपूर विरुद्ध सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यात झालेल्या सामन्यात सोलापूर संघाने 3-0 ने विजय मिळविला.
 
*संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती विरुद्ध सरदार पटेल विद्यापीठ वल्लभविद्यानगर, गुजरात यांच्यात झालेल्या सामन्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 3-0 ने विजय प्राप्त केला.
 
*महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर विरुद्ध महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ, अजमेर यांच्यात झालेल्या सामन्यात अजमेर विद्यापीठाने 3-0 ने विजय मिळविला.
 
* कोर्ट नं. 4 वर झालेल्या सामन्यात स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विरुद्ध स्वामी रामानंद राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर यांच्यात झालेल्या सामन्यात नांदेड विद्यापीठाने 3-0 ने विजय प्राप्त केला.
 
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विरुद्ध सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजकोट विद्यापीठाने 3-1 ने विजय मिळविला.
 
*बरकतुल्लाह विद्यापीठ, भोपाळ विरुद्ध गोविंद गुरु विद्यापीठ, गोध्रा यांच्या झालेल्या सामन्यात भोपाळ विद्यापीठाने 3-0 ने विजय प्राप्त केला.
 
* शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विरुद्ध कडी सर्व विद्यापीठ, गांधीनगर यांच्यात झालेल्या सामन्यात कोल्हापूर विद्यापीठाने एकतर्फी 3-0 ने विजय प्राप्त केला.
अग्रलेख
जरुर वाचा
दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल;

दारू महागणार, राज्याला मिळणार १४ हजार कोटी , मद्य धोरणात बदल; 'महाराष्ट्र मेड लिकर' बाजारात आणणार

महाराष्ट्राच्या तिजोरीत थेट १४ हजार कोटी रुपयांची भर घालण्यासाठी महायुती सरकारने मद्य धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. मंगळवार, दि. १० जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क ३ पटीवरून ४.५ पट वाढवण्याचा, तर देशी मद्याचा दर १८० रुपयांवरून २०५ रुपये प्रति प्रुफ लिटर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 'महाराष्ट्र मेड लिकर' या धान्याधारित मद्याच्या नव्या प्रकारालाही मंजुरी देण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121