राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला

    30-Oct-2018
Total Views | 15
 
 

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राहुल गांधी चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे संबध पनामा पेपर प्रकरणाशी जोडून टीका केली. याविरोधात शिवराज सिंह यांचे पुत्र कार्तिकेय यांनी मंगळवारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला.

 

शिवराज सिंह चौहान यांच्या मुलाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणाशी जोडल्याने राहुल गांधींवर चौफेर टीका होत आहे. चुक लक्षात आल्यावर कन्फ्युज झाल्याने त्यांचा उल्लेख केल्याची कबुली राहुल गांधी यांनी दिली. सोमवारी राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशच्या प्रचारादरम्यान एका सभेला संबोधित केले. त्यावेळी शिवराज सिंह यांना लक्ष्य करत मामाजींच्या मुलाचे नाव पनामा पेपर प्रकरणात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. याचा समाचार घेत शिवराज सिंह चौहान यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, कुणी कनिष्ठ पातळीवरील नेत्याने असे आरोप केले तर लक्षात येऊ शकते, पण राहुल गांधींनी असे म्हणणे दुर्भाग्यपूर्ण आहे.

 
  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121