रेशनकार्ड धारकांना खुशखबर!

    17-Oct-2018
Total Views | 22

 

 

 
 

रेशनकार्डावर दिवाळीनिमित्त मिळणार ज्यादा साखर आणि डाळ 

 
 
मुंबई : रेशन दुकानातून दिवाळीसाठी धान्य घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. या दिवाळीला रेशन कार्डावर नेहमी दिल्या जाणाऱ्या कोट्यापेक्षा एक किलो साखर आणि २ किलो डाळ जास्त मिळणार आहे. तसेच आयोडिनयुक्त मीठही उपलब्ध असणार आहे.
 

रेशन दुकानावर साखर ही बाजार भावापेक्षा थोडी स्वस्त म्हणजे २० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असेल. डाळ मात्र नेहमीच्या दरात ३० रुपये प्रति किलो मिळेल. अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.

 
डाळींमध्ये तूरडाळ, चणाडाळ, उडीद, डाळ घेण्याचा पर्याय रेशनकार्ड धारकांना देण्यात आला आहे. तसेच या सणासुदीच्या काळात खव्यामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी विविध ठिकाणी भरारी पथके नेमण्यात आली असून त्यांद्वारे तपासणी केली जाणार आहे.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121