
सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता राजकुमार राव हे दोन्ही पेटा (PETA) इंडिया (पिपल फॉर द इथिकल ट्रीटमेन्ट ऑफ अॅनिमल्स)साठी या वर्षीचे मानकरी, ठरले आहेत. पेटा ही प्राण्यांसाठी काम करणारी तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण करणारी एक अमेरिकी सामाजिक संस्था आहे. ही संस्था दरवर्षी प्राण्यांच्या हक्कासाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या लोकांना सन्मानित करत असते. त्यात जी लोकं प्राण्यांपासून बनलेल्या वस्तूंचा वापर करत नाहीत, मग ते कपडे असोत वा कुठल्याही प्रकारचा खायचा पदार्थ असो, त्यांचा देखील सन्मान या संस्थेद्वारे होत असतो.
२०१७ मध्ये राजकुमार आणि आलिया या दोघांनीही शाकाहारी अन्नाचा अधिकाधिक प्रचार आणि वापर केल्यामुळे हे दोघेही या पुरस्कारासाठी पात्र ठरले. आलिया भट्टच्या एकूण, इंस्टाग्राम आणि फेसबुक पोस्ट पाहून लक्षात येतेच की, ती खरंच प्राणीप्रेमी आहे. "प्राणी दत्तक घ्या, विकत नाही.," या तिच्या ब्रिदवाक्यामुळे ती प्राण्यांसाठी जणू परीच बनली आहे.
आलिया भट्ट आणि राजकुमार राव या दोघांनीही, अमिताभ बच्चन, कंगना राणावत, विद्युत जमवाल, आर. माधवन, शाहिद कपूर, श्रीदेवी आणि सनी लिओनी या सेलिब्रिटींना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला आहे.