माऊथ ऑर्गन कार्यशाळा संपन्न

    23-Oct-2017
Total Views | 3


 

ठाणे : अनेक संगीत दिग्दर्शकांनी बॉलिवूड चित्रपटात अविस्मरणीय चाल देण्यासाठी वापरलेले, परंतु तरीही फारसे प्रसिद्ध किंवा प्रकाशात न आलेल्या ‘माऊथ ऑर्गन’ या वाद्यास प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ठाण्यात नुकतीच एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गुरूकुल प्रतिष्ठान, ठाणे आणि सुरभि संगीत अकादमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत पुण्यातील ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि संगीत सम्राट फेमप्रसिद्ध माऊथ ऑर्गन वादक सुनील पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना माऊथ ऑर्गन वादनाचे धडे दिले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित विवेक सोनार यांनी भविष्यात ठाणे शहरात सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माऊथ ऑर्गन वादनाची निवासी कार्यशाळा घेण्याबाबत सुतोवाच केले. तसेच यापुढेही अशा कार्यशाळा नियमित स्वरूपात घेण्यात येतील असे जाहीर केले.

या कार्यशाळेत ठाणे, मुंबई, धुळे, भंडारा अशा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून २५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. माऊथ ऑर्गन वाजविताना श्वासावर नियंत्रण ठेवणे, तसेच दीर्घ श्वास घेणे-सोडणे या प्रक्रिया म्हणजे फुफ्फुसांची क्षमता वाढविण्याचा एक योगाभ्यास असल्याचे सुनील पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यशाळेत माऊथ ऑर्गन कसा पकडावा, सरगम कशी वाजवावी, इथपासून तर बेंडिंग, टंग ब्लाकिंग, ऑर्गन प्लेईंग, ट्रील्स यांसारखी आधुनिक कौशल्य देखील पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना शिकवली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121