वेदांमध्ये गूढ ज्ञान लपले आहे, असे आपण कायमच म्हणतो आणि ते सत्यही आहे. वेदांचे, त्यातील सुक्तांचे सखोल अध्ययन कमी झाले आहे. वेदातील देवीस्तुती म्हणून प्रसिद्ध असलेल्या शी सूक्ताचा विज्ञानाधिष्ठित अन्वयार्थ...
Read More
सर्व प्रकारचे प्रदूषण... मग ते पृथ्वी, अग्नी, वायू, जल, आकाश या पंचमहाभूतांच्या संदर्भातील असो की नद्या, वनस्पती, पशु-पक्षी आदींच्या बाबतीतले, यांचे संरक्षण कसे करावे आणि वाढत्या प्रदूषणामुळे सबंध जीवसृष्टीला कसे वाचवावे, याबाबतीत वेदांचे चिंतन हे फारच मौलिक स्वरूपाचे आहे. कालच साजरा झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेदांचे पर्यावरणपूरक व्यापक विचार मांडणारे हे चिंतन...
वेद-उपनिषदाच्या अभ्यासक आणि तत्वज्ञ पिंपरी-चिंचवडच्या कल्पना प्रकाश क्षीरसागर. ‘एकोहं बहुस्याम’ म्हणत जीवन जगणार्या कल्पना क्षीरसागर यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...
अथर्ववेद हा वैद्यकशास्त्राचा विश्वकोश आहे. चारही वेद वैद्यकशास्त्राच्या विविध पैलूंच्या संदर्भाने परिपूर्ण आहेत.जग झपाट्याने बदलत आहे, पण जेव्हा आपण वेदांकडे पाहतो तेव्हा माहितीची समृद्ध खाण आपल्याला गवसते. त्यामुळे अथर्ववेद हा आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला देऊ शकतो, असे विधान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
वेदारंभ संस्कारातील वेगवेगळ्या विधी संपन्न करीत असताना मध्यवर्ती प्रसंगी गुरू आपल्या शिष्याला हा मंत्र शिकवतात. सर्वात आधी याच मंत्राने वर्णमाला, अष्टाध्यायी, व्याकरण, वेद इत्यादी शिकवण्यास प्रारंभ होतो. म्हणूनच वेदारंभाचा हा मूलभूत मंत्र आहे.
मागील लेखात स्त्रीमहात्म्यावर प्रकाश टाकत तिच्या आभूषणांविषयी चर्चा केली होती. वेदमंत्रात उद्धृत केलेल्या सहा आभूषणांपैकी तीन आभूषणांवर प्रकाश टाकण्यात आला होता. आता प्रस्तुत लेखात उर्वरित तीन आभूषणे व तिला वेदमंत्रात देण्यात आलेल्या दोन आदेशांविषयीची चर्चा करूया.
वेदांनीही मोठ्या प्रमाणात धन मिळवून श्रीमंत होण्याचा संदेश दिला आहे. पण, ते धन वाईट मार्गाने मिळवता कामा नये. त्याकरिता धर्मतत्त्वाची लक्ष्मणरेषा ओढली आहे. धर्माशिवाय धन म्हणजे सारे काही व्यर्थच! धन मिळविताना त्याच्या दानाची व त्यागाची वृत्ती जोपासली जावी, असे वेदांना अभिप्रेत आहे.
संस्कृत भाषा ही अनेक भाषांचे जसे मूलस्थान आहे, तसेच अनेक आधुनिक शास्त्रांचे मूलज्ञानस्थानही आहे. आज ज्या शास्त्रांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो, त्या शास्त्रांचा चिकित्सक अभ्यास संस्कृत साहित्यात, अगदी वैदिक साहित्यातही झालेला आढळतो. पर्यावरणासारखा संवेदनशील झालेला विषयही संस्कृत साहित्याने हाताळलेला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संस्कृत साहित्यातील पर्यावरण संकल्पनेचे संदर्भ या लेखातून पाहूया.
एका अर्थाने राज्यव्यवस्था चालविण्याची जबाबदारीच अधिकार्यांवर असते. म्हणून ते खर्या अर्थाने ईश्वरीय व्यवस्थेला चालविणारे प्रतिनिधी आहेत. आदर्श राज्यव्यवस्थेकरिता आदर्श अधिकार्यांबाबतचे तत्त्वचिंतन सर्वात अगोदर वेदांनी प्रतिपादिले. यावरून वैदिक ऋषींची ज्ञानदृष्टी किती सूक्ष्म व व्यापक स्वरूपाची आहे, हे आपणांस निदर्शनास येते.
‘राष्ट्र’ ही एक व्यापक संकल्पना आहे. वेदांनी समग्र भूमीलाच ‘राष्ट्र’ म्हणून संबोधले आहे. अथर्ववेदातील बाराव्या कांडातील पहिले सूक्त हे ‘भूमिसूक्त’ म्हणून ओळखले जाते. यात या भूमीवर राहणार्या मनुष्यांसह इतर प्राण्यांची काळजी वाहिली आहे. आपली भूमी सर्वदृष्टीने सुखसंपन्न कशी होईल? तसेच या भूमीवर निवास करणारे नागरिक व इतर प्राणी आनंदाने कसे जगतील, यासंदर्भात सुंदर विश्लेषण एकूण ६३ मंत्रांमध्ये झाले आहे.
हे इन्द्र, हे परमेश्वरा! (यम्) ज्या माणसाचे (प्रचेतस:) विवेकशील असे महाज्ञानी, (वरुण:) वरणीय श्रेष्ठ सुजन, (मित्र:) प्रेम व स्नेह करणारे मित्रगण आणि (अर्यमा) न्यायकारी लोक (रक्षन्ति) रक्षण करतात, (स:)तो (जन:) मनुष्य (कि:) कोणाकडूनही (न दभ्यते) दाबला व मारला जाऊ शकत नाही.
मागच्या लेखापासून आपण 'खगोलशास्त्र' (Astronomy) ही ज्ञानशाखा आर्यांच्या स्थलांतराच्या बाबतीत काय सांगते, याचा एक धावता आढावा घेत आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने वैदिक साहित्यातले खगोलीय उल्लेख, पृथ्वीची परांचन गती (Precession) आणि तिच्या आधारे स्व. लोकमान्य टिळकांनी केलेले संशोधनाचे मोठे काम आपण पाहिले. त्यांनी हे सगळे संशोधन त्यांच्या 'The Orion' या ग्रंथात मांडले आहे. त्याप्रमाणेच त्यांचा अजून एक ग्रंथ आहे 'The Arctic Home in Vedas' अर्थात 'आर्यांचे उत्तर ध्रुवीय मूलस्थान.' ग्रंथाच्या नावावरून लक्षात येते त्
निलेश नीलकंठ ओक यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पी.एचडी पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी रामायण व महाभारतात दिलेली ग्रहस्थितीवर आधारित रामायण व महाभारत कालाचे निष्कर्ष काढले आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘When did the Mahabharata War Happen?’ आणि ‘The Historic Rama - Indian Civilization at the end of Pleistocene’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आज त्यांच्या लेखाचा अनुवाद.
‘पश्येम शरदः शतम्।’ म्हणजेच आम्ही शंभर वर्षांपर्यंत ईश्वरीय बीजतत्त्वाला ज्ञानदृष्टीने पाहावे! सामान्य लोकांप्रमाणे किंवा पशूंप्रमाणे केवळ डोळ्यांनी पाहणे नव्हे, तर सूक्ष्मदृष्टिकोनातून त्या त्या भगवद्निर्मित वस्तूंमध्ये दिव्यत्वाचे दर्शन करावे. वस्तू किंवा पदार्थांच्या अंतरंगात काय दडले आहे, यावर विवेकशक्तीने अवलोकन करावे. अशा या असामान्य पाहण्यालाच ‘दर्शन’ असे नाव पडले आहे.
वेदांमधील लढाया शोधण्याच्या या प्रवासात अजून एक संघर्ष पुन्हा पुन्हा दिसत राहतो. मागच्या लेखात दाशराज्ञ युद्धाची कथा आपण पाहिली. त्यात सुदास राजाच्या आणि इंद्राच्या एका विशिष्ट शत्रूचे नाव ‘पणि’ असे आपण पाहिले. प्रत्यक्ष दाशराज्ञ युद्धात या पणींचा फारसा सहभाग किंवा भूमिका असल्याचे या वर्णनावरून जरी दिसत नसले, तरी इंद्राच्या याच्याशी झालेल्या संघर्षाची वर्णने ऋग्वेदात अजूनही इतरत्र काही ठिकाणी आहेत. हे पणि म्हणजे कोण, कुठले लोक? यांनी नेमकी काय आगळीक केली, की ज्यामुळे इंद्राने यांच्या विरुद्ध शस्त्र उचलले? न
वेदांत हा आम्हास एक दुसर्यांना वाटून खाण्याचा संकेत करतो- ‘केवलाघो केवलादी भवति।’ म्हणजेच जो केवळ ‘आदी’ म्हणजे एकटाच खाणारा आहे, तो केवळ ‘अद्य’ म्हणजे पापाचे भक्षण करणारा आहे. वेदांची संस्कृती दातृत्वाची शिकवण देते. केवळ ‘मी व माझेच सर्वकाही...’ अशा स्वार्थी वृत्तीने पछाडलेल्या लोकांना वेदांनी ‘राक्षस’ किंवा ‘दानव’ म्हटले आहे.
संजय जाधव दिग्दर्शित खारी-बिस्कीट या चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये खारी आणि तिचा भाऊ यांच्यातील नातं किती घट्ट आहे ते जाणवेल. आणि या आधी गुलदस्त्यात असलेल्या या भाऊ बहिणीचं स्वप्न नक्की काय आहे याचा उलगडा सुद्धा झाला आहे.
अथर्ववेदातील दहाव्या कांडातील सातव्या सूक्तात एकूण ४४ मंत्र आले आहेत. यात प्रारंभिक कांही मंत्रात जगन्नियंत्या परमेश्वराविषयी प्रश्न विचारण्यात आले आहेत. शेवटच्या चरणात ‘स्कम्भं तं ब्रूहि कतम: स्विदेव स:।’ असा प्रश्न केला आहे.
आज ग्रंथरूपात असलेल्या वेदांच्या चारही संहिता कालौघाने नाहीशा झाल्या किंवा या वेदशास्त्राच्या अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया जरी खुंटली तरी अंतरंगातील ज्ञानात्मक वेदराशी कधीच नष्ट होऊ शकत नाही. कारण, वेद हे परमेश्वराचे अमर काव्य आहे.