नवी दिल्ली : अथर्ववेद हा वैद्यकशास्त्राचा विश्वकोश आहे. चारही वेद वैद्यकशास्त्राच्या विविध पैलूंच्या संदर्भाने परिपूर्ण आहेत.जग झपाट्याने बदलत आहे, पण जेव्हा आपण वेदांकडे पाहतो तेव्हा माहितीची समृद्ध खाण आपल्याला गवसते. त्यामुळे अथर्ववेद हा आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला देऊ शकतो, असे विधान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
दरम्यान दि. २७ ऑक्टोबर रोजी जगदीप धनखड यांनी आपल्या पत्नी सुदेश धनखड यांच्यासह बद्रीनाथ आणि केदारनाथ धामला भेट दिली आणि देशाची एकता, अखंडता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना केली.