उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांना अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत करण्याची विनंती केली.
Read More
(16th Finance Commission praises Uttarakhand's financial management) उत्तराखंडला भेट दिलेल्या १६ व्या वित्त आयोगाने उत्तराखंडच्या आर्थिक व्यवस्थापनाची प्रशंसा केली आहे. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगरिया म्हणाले की, "जर कोणत्याही विकसनशील राज्यात संतुलित वित्तीय तूट असेल तर ती वाईट परिस्थिती नाही. हो, ही तूट वाढणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे."
दक्षिणेतील सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ब्लॉकबस्टर हिट पुष्पा 2 मुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या यशानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला, यावर विचारले असता अल्लू अर्जुन म्हणाला की, "प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाला कसं उत्तर द्यायचं, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. मी एक नैसर्गिक अभिनेता आहे, आणि अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे."
Eknath Shinde कभी झुकता नही... सबको झुकाया.. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचा साधा कार्यकर्ता, पण मला हलक्यात घेऊ नका. असा गर्भित इशारा देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात पुष्पा सिनेमा स्टाईल गरजले. निमित्त होते, त्यांच्या वाढदिवसानिमित्त मा. नगरसेवक राम रेपाळे यांनी किसन नगर येथे आयोजित केलेल्या "भाई भंडारा " या मोफत उपक्रामाचे. यावेळी शिंदे यांनी, राज्यात तसेच देशात कुठेही गेलो तर किसननगर मध्ये आल्यानंतर जो आनंद होतो तो वेगळाच असल्याचे नमुद केले.
train accident जळगावातील परांडा रेल्वेस्थानकावर रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेस या रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरली होती. या भीतीने अनेक प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक रेल्वेने पुष्पक रेल्वेला धडक दिली. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी असल्याचे वृत्त आहे. ही घटना दि : २२ जानेवारी २०२५ सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेता अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २' चित्रपटाने २०२४ हे वर्ष विशेष गाजवलं. एकीकडे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या या चित्रपटाला एका महिलेच्या मृत्यूमुळे गालबोट देखील लागलं होतं. आता असाच प्रकार अभिनेता रामचरण याच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाबाबत घडलं आहे. राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाच्या एका इव्हेंटनंतर अशीच दुर्दैवी घटना घडली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
दाक्षिणात्य सूपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ - द रुल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच १०० कोटींचा गल्ला पार केला होता. त्यानंतर चित्रपटाने अवघ्या कमी कालावधीत १००० कोटींचा पल्ला बॉक्स ऑफिसवर पार करत भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.
सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपाटांचे रेकॉर्ड मोडले. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत भारतात १०६२ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमध्ये विशेष प्रिमियर आयोजित करण्यात आला होता ज्याच्यासाठी अल्लू अर्जूनसह रश्मिका मंदाना आणि इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी चाहत्यांनी अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी केलेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यात एका महिलेला जीव गमवावा लागला होता.
पुष्पा २ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यापासून रोज नवे विक्रम करतो आहे. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा पुष्पा मात्र आता चांगलाच अडचणीत येणार असल्याचे दिसते आहे. तेलंगणाच्या विधानसभेत बोलताना एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी अभिनेता अल्लू अर्जुनवर गंभीर आरोप केला आहे.
२०२४ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे ठरले. प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली. अवघ्या काही दिवसांनी २०२४ हे वर्ष संपेल आणि २०२५ हे वर्ष नव्याने मनोरंजनासाठी सज्ज होईल. जाणून घेऊयात २०२४ या वर्षात कोणत्या टॉप १० चित्रपटांनी तुफान कमाईसह प्रेक्षकांची मने जिंकली. ‘सॅकलिंक’ने २०२४ वर्षातील ब्लॉकबस्टर सिनेमांची यादी दिली आहे. यात हिंदीतील ४ तर आणि ६ दाक्षिणात्य चित्रपटांचा समावेश आहे.
(Uttarakhand) “उत्तराखंडमध्ये जानेवारी २०२५ पासून ‘समान नागरी कायदा’ लागू करण्यात येणार आहे,” अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बुधवार, दि. १८ डिसेंबर रोजी दिली.
अभिनेता अल्लू अर्जुन सध्या 'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटामपळे चांगलाच चर्चेत आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. जगभरात या चित्रपटाने ७ दिवसांत १००० कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे अल्लूच्या 'पुष्पा २' ची चर्चा सुरु असून दुसरीकडे तो लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशाही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, यावर आता अभिनेत्याच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे.
'पुष्पा २ : द रुल' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबाद मधील संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत २ जणांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आता त्यावर तेलंगणा पोलिसांनी कारवाई करुन अल्लु अर्जुनला ताब्यात घेतले आहे.
९० च्या दशकातील सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा आवडता सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’. अभिनेते मुकेश खन्ना यांनी साकारलेला शक्तिमान आजही पुन्हा पाहावासा वाटतो. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ‘शक्तिमान’ हा चित्रपट येणार असे सांगितले जात आहे. पण नेमकी यात शक्तिमान कोणी साकारावा यावरुनही वेगळा वादंग आणि चर्चा सुरु आहे. पण मुकेश खन्ना यांनी स्वत:च दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याचे नाव सुचवले आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ : द रुल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अनेक चित्रपटांच्या कमाईचे त्याने रेकॉर्ड मोॉले असून प्रदर्शनानांतरच्या पहिल्या सोमवारी कलेक्शनच्या परीक्षेत पुष्पा २ पास झाला आहे की फेल हे जाणून घ्यायला हवं. ५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट देशभरात तेलुगु भाषेसह हिंदी, तमिळ,कन्नडा, मल्याळम आणि बंगालीत प्रदर्शित झाला. पुष्पा २ या चित्रपटाने जगभरात पाच दिवसांत ९०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटामुळे दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन प्रेक्षकांचा आवडता अभिनेता झाला आहे. 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडित काढून नवा इतिहास रचला आहे. दरम्यान, जितका या चित्रपटात अल्लू अर्जूनचा अभिनय गाजला त्याच प्रमाणे अभिनेता फहाद फालिसच्याही अभिनयाची तितकीच चर्चा झाली. पण या चित्रपटातील त्याची भूमिका कदाचित फारशी प्रेक्षकांना आवडली नसल्यामुळे अशी माहिती मिळत आहे की फहाद फासिल 'पुष्पा ३'मध्ये दिसणार नाही.
बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांच्या मनावर सध्या एकाच चित्रपटाने अधिराज्य गाजवलं आहे तो म्हणजे अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असलेल्या 'पुष्पा २' या चित्रपटाने. देशभरात ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १०० कोटींच्या पुढे कमाई करण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांनी दिलेला दणकून प्रतिसादामुळे ‘पुष्पा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कमाईचे नवे रेकॉर्ड तयार करत इतिहास रचला आहे.
अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २'ची सध्या देशभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. एकीकडे प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मात्र, दुसरीकडे चित्रपटाच्या शोदरम्यान काही दुर्घटना देखील घडल्या आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. यावरुन अभिनेता अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून या सर्व प्रकरणावर अल्लू अर्जुनने मौन सोडलं आहे.
सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ ( Pushpa 2 ) हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अल्लू अर्जूनने प्रमुख भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना, फहाद फासिल यांनीही महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. जाणून घ्या नेमका चित्रपट आहे तरी कसा..
मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरात सध्या पुष्पाचीच हवा आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनित पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून दुसरीकडे मात्र अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापुर्वी ४ डिसेंबरच्या संध्याकाळी हैदराबादमध्ये विशेष प्रीमियर झाला होता. यावेळी अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि चित्रपटाची टीम त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह हैदराबादच्या संध्या चित्रपटगृहामध्ये च
सध्या चित्रपटसृष्टीत एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे पुष्पा २ : द रुल ची. ५ डिसेंबर २०२४ रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दोन दिवसांत १८६.२७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळवला आहेच पण त्यासोबत अनेक ठिकाणी राडे झालेले पाहायला मिळाले आहेत.
भुरळ पाडणारे संवाद आणि ‘बिग बजेट’ चित्रपटांचे अलौकिक उदाहरण
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनीत पुष्पा २ या चित्रपटाची ३ वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहात होते. अखेर ५ डिसेंबर २०२४ रोजी पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला असून लवकरच पुष्पा ३ येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. पुष्पा २ चित्रपटासाठी प्रेक्षकांना तीन वर्ष वाट पाहावी लागली होती. आता पुष्पा ३ साठी किती वेळ वाट पाहावी लागणार हे समोर आलं आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनिक पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात तेलुगू भाषेसह हिंदी, तमिळ, कन्नडा आणि बंगासी भाषेत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शनापुर्वीच प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आणि आता बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली आहे. मात्र, चित्रपटाचा निर्मात्यांना मोठा धक्का लागला आहे कारण हा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे.
अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असणारा पुष्पा २ हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. 'पुष्पा २'ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल १०० कोटींची कमाई केली असून त्या रकमेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एकीकडे ‘पुष्पा २’ ची चर्चा सुरु असताना दुसरीकडे मात्र आत्तापासूनच ‘पुष्पा ३’ बद्दल चर्चा सुरु झाली असून त्यात अल्लू अर्जून नाही तर वेगळाच अभिनेता प्रमुख भूमिकेत दिसणार असेही म्हटले जात आहे.
( Uniform Civil Code )उत्तराखंडच्या समान नागरी कायद्याची नियमावली तयार झाली असून आता लवकरच राज्यात कायदा लागू केला जाईल, असे प्रतिपादन उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी शुक्रवारी केले आहे.
उत्तराखंडच्या पुष्कर सिंह धामी यांनी सरकारने अन्नात थुंकणाऱ्यांसाठी बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी कारवाई करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. असे कृत्य करणाऱ्याला १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची घोषणा केली. यासोबतच हॉटेल्स आणि ढाबे चालवणाऱ्यांची आणि त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच स्वयंपाक घरात सीसीटीव्ही बसवण्याचा आदेशष सरकारने दिले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणारा 'दि एआय धर्मा स्टोरी' २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतीच ही तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून चित्रपटाचे नवीन पोस्टरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. यात पुष्कर जोगबरोबर स्मिता गोंदकर आणि दीप्ती लेले दिसत आहेत. पोस्टर पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहे
उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एका कट्टरपंथीयाचा तलावात उडी मारून मृत्यू झाला. हा तरुण पोलिसांच्या गोरक्षक पथकापासून स्कूटरवरून पळत होता. यात कट्टरपंथीयाने तलावात उडी मारल्याने मृत्यु झाला असून उत्तराखंड पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य उघड झाले आहे. दरम्यान, तलावात उडी मारून झालेल्या मृत्युस मॉब लिंचिंग म्हणून भासवण्यात आले आहे.
लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिकपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता. पण आता या चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे विकी कौशलच्या छावा चित्रपटाची टक्कर अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ सोबत होणार आहे.
उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात एका टेम्पो चालकाने मानसिकदृष्ट्या कमकुवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्याच्या पठ्ठयाला जोर का धक्का दिला आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक असलेल्या तब्बल ८ माजी नगरसेवकांनी अजितदादा पवार यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजितदादा गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना मध्यंतरी ठाण्यात आलेल्याअजितदादानी आमदार जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख ठाण्याचा पठ्ठया
देशात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात हालचाली सुरू आहेत. आता उत्तराखंड सरकार राज्यात समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत असून सरकारकडून मसुदा सादर करण्यात आला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या युसीसी पॅनलचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर भाविकांना चारधाम यात्रेवर जाता येणार नाही. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर भाविकांना ऋषिकेशच्या पलीकडे न जाण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, उत्तराखंडमधील हवामान स्थिती पाहता, चारधाम यात्रा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने पुन्हा एकदा नवा किर्तीमान रचला आहे. इस्त्रोने तिसऱ्यांदा पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली. इस्रोने सांगितले की यावेळी प्रक्षेपण वाहनाची चाचणी अधिक आव्हानात्मक परिस्थितीत करण्यात आली आणि ती सर्व मानके पूर्ण करते. या चाचणीमध्ये, इस्रोने लँडिंग इंटरफेस आणि विमानाच्या उच्च वेगाने लँडिंगची स्थिती तपासली.
पुष्कर जोग दिग्दर्शित 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे प्रोमोमधून दिसत आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणूकीचीच गडबड सुरु आहे. २० मे २०२४ रोजी लोकसभा निडणूकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा (Loksabha Elections 2024) संपन्न होणार आहे. शिवाय आयपीएल देखील दुसरीकडे सुरु आहे. याचा परिणाम मात्र चित्रपटसृष्टीला थोड्याफार प्रमाणात भोगावा लागणार आहे. मे महिन्याची सुट्टी असल्यामुले प्रेक्षक कुटुंबासह चित्रपट पाहायला जाणार असतील खरे पण तेलंगणामध्ये चक्क १० दिवस चित्रपटगृह बंद असणार आहेत.
भारत आणि चीन यांच्यातील स्पर्धेत सोयीनुसार दोघांशी सलगी करून त्याची किंमत वसूल करण्याचे धोरण नेपाळने अवलंबले आहे. कधी भारताची शिडी चढायची आणि चीनच्या सापावरून घसरत खाली यायचे आणि कधी चीनची शिडी चढायची, असे केल्यामुळे सत्तेवर राहण्यात प्रचंड यांना यश मिळाले असले, तरी त्यामुळे नेपाळचे नुकसानच झाले आहे.
अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा १’ आणि ‘पुष्पा २’ (Pushpa 2) या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. पहिल्या भागाच्या अप्रतिम यशानंतर दुसरा भाग कधी येणार याची चाहते वाट पाहात असतानाच ‘पुष्पा २’ (Pushpa 2) ची घोषणा झाली. यानंतर अल्लू अर्जूनचा थक्क करणारा पहिला लूक समोर आला होता. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक अवाक् करणारी बातमी समोर आली आहे. या चित्रपटातील प्रसंगांसाठी चक्क ६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा 'धर्मा- दि एआय स्टोरी' लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (Artificial Intelligence) आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असूननुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित 'धर्मा- दि एआय स्टोरी'चे (Artificial Intelligence) पुष्कर जोग दिग्दर्शक आहेत. पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके विषय दिले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहे
हिंदी चित्रपटसृष्टीवर दाक्षिणात्य चित्रपटांचा आणि कलाकारांचा पगडा अधिक वाढत चालला आहे. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पुष्पा चित्रपट आणि अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun). “पुष्पा राज... मैं झुकेगा नहीं साला” म्हणणाऱ्या अल्लू अर्जुनचे सर्व वयोगटातील चाहते आहेत. आज अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ४२ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात अल्लू अर्जुनबद्दल काही खास माहिती...
हल्दवानी येथील बनभुलपुरा हिंसाचारातील मास्टरमाईंड अब्दुल मलिकच्या अटकेनंतर आता त्याचा मुलगा अब्दुल मोईदलाही अटक करण्यात आली आहे. उत्तराखंड पोलिसांनी मोईदला दिल्लीतून अटक केली आहे. अब्दुल मलिकच्या चौकशीदरम्यान त्याच्या लोकेशनची माहिती मिळाली, त्यानंतर उत्तराखंड पोलिसांच्या अनेक पथकांनी छापे टाकले. अचूक माहितीच्या आधारे मोईदला दिल्लीतून पकडण्यात आले.
उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये जे झाले, ते आता पुन्हा घडणार नाही. ही घटना शेवटचीच. कारण, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत, दंगलखोरांना सोडणार नसल्याचे सांगितले. बरं, दंगलखोरांवर जी कायदेशीर कारवाई होईल ती होईलच; मात्र आता धामी सरकारचा सध्याचा कारवाईचा ‘पॅटर्न’ फार वेगळा आहे.
बेकायदा मशीद-मदरसा पाडल्यानंतर उसळून आलेला हल्दवानी हिंसाचार प्रकरणातील फरार असलेल्या प्रमुख ९ आरोपींचे पोस्टर जारी करण्यात आले आहेत. दि. ०८ फेब्रुवारी रोजी हल्दवानी परिसराला हादरवणाऱ्या हिंसाचारानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाकडून हिंसाचार घडविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करत आहे.
मानवी कल्याणाच्या सगळ्याच परिभाषा या केवळ कायद्याच्या कलमातून व्यक्त होत नसतात, तर त्यात समाज अभिव्यक्ती, नीतिमूल्ये आणि माणूसपणही जोखणे आणि संवर्धित करणे आवश्यक असते. या परिप्रेक्ष्यात उत्तराखंडामधील ‘समान नागरी कायद्या’तील असे समाजमानवीपणाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
'समान नागरी कायदा आला तरीही आम्ही चार निकाह करु', अशी गरळ देहरादून शहर काजींनी यूसीसीच्या निषेधार्थ ओकली. ते म्हणाले, आम्ही फक्त शरियतचे पालन करू, तसेच यूसीसीच्या निषेधार्थ मुस्लिम समाज रस्त्यावर उतरणार असेही शहर काजी यावेळी म्हणाले. दरम्यान, उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा(यूसीसी) विधेयक सादर करण्यात आले आहे.
उत्तराखंडने बुधवारी इतिहास रचला. विधानसभेत चर्चेनंत समान नागरी कायदा विधेयक मंजूर करण्यात आले. विधानसभेत दिवसभर या विधेयकावर चर्चा झाली, त्यानंतर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सभागृहास संबोधित केले. सायंकाळी समान नागरी कायदा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेद्वारेच हा कायदा केल्याचे मुख्यमंत्री धामी म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर राज्यात समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे पहिलेच राज्य ठरले. एका देशात ‘एक विधान, एक निशान आणि एक प्रधान’ हेच लागू होईल, असे भाजपचे धोरण. समान नागरी कायदा हा या व्यापक धोरणाचाच एक भाग. आता या कायद्याला आव्हान दिल्यास एरवी घटनेला सर्वोच्च मानणार्या आणि कायद्यापुढे सर्वजण समान आहेत, असे मानणार्या नेते आणि पक्षांचे पितळ लगेचच उघडे पडेल.
उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा (UCC) लागू करण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यूसीसी विधेयक सभागृहात मांडले. आता उत्तराखंड विधानसभा यावर चर्चा करेल आणि त्यानंतर ते पास होईल.उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी विधानसभेत समान नागरी कायदा मसुदा सादर करताच तिथे उपस्थित आमदारांनी वंदे मातरम आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. दुपारच्या जेवणानंतर या विधेयकावर चर्चेसाठी वेळ निश्चित करण्यात आला. यावर आता विधानसभेत दुपारी दोनपासून चर्चा होणार आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहे