हल्दवानी हिंसाचारातील फरार ९ आरोपींचे पोस्टर जारी

    17-Feb-2024
Total Views |
haldwani-violence-posters-of-nine-absconding-accused

नवी दिल्ली :
बेकायदा मशीद-मदरसा पाडल्यानंतर उसळून आलेला हल्दवानी हिंसाचार प्रकरणातील फरार असलेल्या प्रमुख ९ आरोपींचे पोस्टर जारी करण्यात आले आहेत. दि. ०८ फेब्रुवारी रोजी हल्दवानी परिसराला हादरवणाऱ्या हिंसाचारानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाकडून हिंसाचार घडविणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करत आहे. दरम्यान, बनभूलपुरा भागात बेकायदेशीरपणे बांधलेला मदरसा पाडल्याच्या कारणावरून 8 फेब्रुवारी रोजी हल्द्वानीला हादरवलेल्या हिंसाचारानंतर, पोलिसांनी अब्दुल मलिक आणि त्याचा मुलगा अब्दुल मोईद यांची घरे जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, बेकायदेशीर मदरसा पाडल्यानंतर कट्टरपंथी जमावाने पोलिसांवर हल्ला केला. तसचे, या हल्ल्याआधी जमावाकडून छतावरून पोलिसांवर दगडफेक व काहीजण रस्तावर पेट्रोल बॉम्ब घेऊन हिंसाचार घडवित होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत राज्यात हिंसाचार घडवून आणणाऱ्या अशा बदमाशांना जागा नाही, असा आमच्या सरकारचा हा स्पष्ट संदेश आहे, असे म्हणत कठोर कारवाईचे आदेशदेखील दिले.