पुढील दहा दिवस चित्रपटगृहांना टाळं; लोकसभा निवडणुक आणि 'IPL'चा फटका
17-May-2024
Total Views | 39
मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणूकीचीच गडबड सुरु आहे. २० मे २०२४ रोजी लोकसभा निडणूकीचा पाचवा आणि शेवटचा टप्पा (Loksabha Elections 2024) संपन्न होणार आहे. शिवाय आयपीएल देखील दुसरीकडे सुरु आहे. याचा परिणाम मात्र चित्रपटसृष्टीला थोड्याफार प्रमाणात भोगावा लागणार आहे. मे महिन्याची सुट्टी असल्यामुले प्रेक्षक कुटुंबासह चित्रपट पाहायला जाणार असतील खरे पण तेलंगणामध्ये चक्क १० दिवस चित्रपटगृह बंद असणार आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग आणि चाहता वर्ग सध्या मोठ्या संख्येने वाढत चालला आहे. पुष्पा २, कल्कि २९८९ एडी असे अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. पण तरीही तेलंगाणामध्ये 10 दिवस चित्रपटगृह बंद असणार असल्याचं समोर आलं आहे. यात एकपडदा अर्थात सिंगल स्क्रिन चित्रपटगृहं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परंतु, आर्थिक नुकसान वाचवण्यासाठी लोकप्रिय कलाकारांचे जुने चित्रपट पुन्हा एकदा प्रद्रशित करण्यात येणार आहेत असे देखील सांगितले जात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच २५ मे रोजी 'लव मी','गँग्स ऑफ गोदावरी','सुधीर बाबूचा 'हरोम हारा' आणि 'सत्यभामा' प्रदर्शित होणार आहे.