प्रायव्हेट जेट ते फिल्म स्टुडिओज.; अल्लू अर्जुनची करोडोंची संपत्ती पाहाच

    08-Apr-2024
Total Views | 36
अल्लू अर्जुन याची प्रमुख भूमिका असलेला पुष्पा २ चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.
 

allu arjun  
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीवर दाक्षिणात्य चित्रपटांचा आणि कलाकारांचा पगडा अधिक वाढत चालला आहे. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पुष्पा चित्रपट आणि अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun). “पुष्पा राज... मैं झुकेगा नहीं साला” म्हणणाऱ्या अल्लू अर्जुनचे सर्व वयोगटातील चाहते आहेत. आज अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ४२ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात अल्लू अर्जुनबद्दल काही खास माहिती...
 

allu arjun  
 
८ एप्रिल १९८२ रोजी चेन्नईमध्ये जन्मलेल्या अल्लू अर्जुनचे संपूर्ण कुटुंब चित्रपटसृष्टीशी जोडलेले आहे. त्याचे वडिल अल्लू अरविंद हे चित्रपट निर्माते आणि फिल्म डिस्ट्रीब्युटर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अल्लू अर्जूनची २०२४ मधील एकूण नेटवर्थ ४६० कोटी रुपयांच्या आसपास आहे. एका चित्रपटासाठी अल्लू अर्जुन १५ कोटींच्या घरात मानधन घेतो. याशिवाय तो बऱ्याच जाहिराती आणि ब्रँड अँडोर्समेंटच्या माध्यमातून कोट्यवधी कमावतो.
 

allu arjun  
 
अल्लू अर्जुनचा हैदराबादमध्ये आलिशान असा ८००० चौरस फूट जागेत बांधलेला बंगला असून त्याची किंमत जवळपास १०० कोटी आहे. याशिवाय अल्लूकडे स्वत:ची पर्सनल ब्लॅक खासगी व्हॅनिटी व्हॅनही आहे. जिची किंमत ७ कोटींच्या आसपास आहे. बंगला आणि व्हॅनिटी व्यतिरिक्त काही फ्लॅट्स आणि एक क्लबचाही तो मालक आहे. याशिवाय अल्लू अर्जुनकडे प्रायव्हेट जेट असून त्याची किंमत ८० कोटींच्या जवळपास आहे. शिवाय अल्लू अर्जूनकडे Range Rover, Hummer H2, BMW XS, aguar XJL, Audi A7 अशा आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. आणि मनोरंजन क्षेत्रातील असल्यामुळे अल्लूच्या मालिकेचे काही फिल्म स्टुडिओ देखील हैदराबादमध्ये आहेत. इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक असलेल्या अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121