मुंबईतील लोकल सेवा आणि बेस्ट सेवेनंतर आता मुंबई मेट्रो सेवेलाही मुंबईकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संचलित मुंबई मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावरून एकाच दिवशी तब्बल ३ लाख १ हजार प्रवाशांनी प्रवास करत एक नवीन प्रवासी विक्रम केला आहे, अशी माहिती महामुंबई मेट्रो ऑपरेशनल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या गाठत नवा मैलाचा दगड !, असे म्हणत एमएमएमओसीएलने आपला आनंद व्यक्त केला आहे.
Read More
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून साल २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने मान्यता देण्याचा आणि त्यांना 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उबाठा गटाने आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती उबाठा गटाचे वकील देवदत्त कामत यांनी बुधवार दि. २ जुलै रोजी केली असता, न्यायालयाने १४ जुलै रोजी सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.
(Harshwardhan Sapkal) "आघाडीच्या तडजोडींमुळे काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत जिल्हा आणि तालुका कमिट्यांना आघाड्यांबाबत निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिले जातील", असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अलिबाग येथील युवा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरानंतर माध्यमांशी संवाद साधतेवेळी केले आहे.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोेकल रेल्वेच्या प्रवासावर मुंब्रा येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. साहजिकच मुंबईकरांच्याही लोकल रेल्वे यंत्रणेकडून सुधारणेच्या प्रचंड अपेक्षा आहेत. पण, मागील ११ वर्षांत मुंबई लोकलच्या सेवेमध्ये निश्चितच काही सकारात्मक बदल झाले आहेत. त्यांचाच यानिमित्ताने आढावा घेणारा हा लेख...
पश्चिम रेल्वेकडून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर पावसाळ्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम हा मुंबईतील लोकलसेवेवर होतो. अनेकदा पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने ट्रॅकवर पाणी साचून मुंबईची लोकल सेवा रखडते. हेच पाहता मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नालेसफाई आणि इतर पावसाळापूर्व तयारी करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेने भुयारी नाल्यांच्या सफाईवर निरीक्षण ठेवण्यासाठी तरंगते कॅमेरे आणि थेट काल्वर्टमध्ये जात निरीक्षण करू शकणाऱ्या कामेरी मदत घेतली आहे. पावसाळ्यात दरवर्षी प्
नुकताच मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकात दोन लोकलमधील गर्दीमुळे लोंबकळून प्रवास करणार्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांवर घासल्या गेल्या आणि रुळावर पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. मुंबई लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्युमुखी पडणार्यांचे प्रमाण दर आठवड्याला सरासरी सात ते नऊ इतके आहे. त्यामुळे आता देशाचे अर्थचक्र गतिमान ठेवणार्या या महानगरातील लोकलचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना आवश्यक आहेत. त्याचाच आढावा घेणारा हा लेख.
राज्यभरात सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना शरद पवारांनी याबाबत एक विधान केले आहे. मंगळवार, १० जून रोजी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून मंगळवार, १० जून रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकावर धडक मोर्चा काढला आहे. गावदेवी मैदानापासून ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.
आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या चार जणांचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झालेल्या या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, दिवा ते छशिमट जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवार, दि. 9 जून रोजी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली, त्यावेळी ते बोलत होते.
लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी भाडेवाढ न करता एसी ट्रेन आणण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवार, १० जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असलेले ६ प्रवासी खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या लोकल ट्रेन अपघाताच्या घटनेने सगळीकडे एकच खळबळ उडाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या दुर्घटनेत जवळपास ५ ते ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघाताची घटना दुर्दैवी असून जखमींचा जीव वाचवण्यास आमचे पहिले प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून समोर येईल, असे ते म्हणाले.
मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील जखमींना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
मुंब्रा–दिवा रेल्वे मार्गावरील घटना मन सुन्न करणारी आहे, असे म्हणत मंत्री आशिष शेलार यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली असून या घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शहरांबद्दल बोललेल्या गोष्टींना आपल्याकडे किंमत नाही. आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे हेच या समजेनासे झाले आहे, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंब्रा-दिवा रेल्वे अपघातावर संताप व्यक्त केला. सोमवार, ९ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातामुळे संपूर्ण राज्य हळहळत असताना आता या अपघातातील मृत आणि जखमी व्यक्तींची नावे पुढे आली आहेत. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत.
मुंब्रा स्थानकदरम्यान घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर सर्वाच स्तरांतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईकरांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. आपली रोजीरोटी ही महत्त्वाची आहेच. पण, त्याचवेळी आपल्या घरातील मंडळी आपली वाट पाहत असते हेसुद्धा महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.
उद्या जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागल्या तरी भाजप आणि महायूती तयार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. सोमवार, २ जून रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने काही तास विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून लोकल सेवेवरही त्याचा परिणाम झाला आहे.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता राज्यातही मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील विविध भागांत गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मुंबईतील अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली असून ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे.
सोमवारी सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबईतील रेल्वे सेवेला जोरदार फटका बसला आहे. विशेषत: मध्य रेल्वेवरील वाहतूक काही काळ खोळंबली असून लोकल रेल्वे गाड्या उशीराने धावत आहेत. पावसामुळे तिन्ही लाईन्सवरील रेल्वेसेवा प्रभावित झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायूतीतच लढायच्या ही भाजपची भूमिका आहे, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. शनिवार, २४ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
(Jyoti Malhotra) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ज्योतीने चारवेळा मुंबई दौरा केल्याची खळबळजनक बाब तपासातून समोर आली आहे. याचदरम्यान मुंबईत ज्योती नेमकं कुठे-कुठे फिरली, या दौऱ्यामागे नेमकं काय कारण होतं, याचा तपासयंत्रणाकडून शोध सुरु आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर असून या निवडणूका महायूती एकत्रित लढणार की, वेगवेगळ्या याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
(Maharashtra Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ‘चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या’ असा आदेश न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यासंदर्भातील सुनावणी आज दि. ६ मे रोजी पार पडली.
(Inspection in Vasai under the leadership of local MLA Sneha Dubey Pandit) वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा ताई दुबे पंडित यांनी आज वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार तसेच विविध विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वसई विधानसभा क्षेत्रातील नाल्यांची व विविध विकासकामांची पाहणी केली.
र्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचा आदेश, मंगळवार दि. ६ मे रोजी दिला आहे. न्यायालयाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणासंहित निवडणूका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र निवडणूक आयोगाला राहुल रमेश वाघ विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्याच्या सुनावणी दरमान्य दिले आहेत.
( One card for local, metro, mono and bus Devendra Fadanvis ) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “येत्या महिनाभरात ‘मुंबई वन’ या सिंगल स्मार्टकार्डची अंमलबजावणी सुरू होईल,” अशी घोषणा केली आहे. “या एका कार्डच्या आधारे मुंबईमध्ये कोणत्याही वाहतुकीच्या पर्यायाने लोकांना प्रवास करता येणार आहे. लंडनच्या ‘ऑयस्टर’ कार्डवर आधारित या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो मुंबईकरांसाठी दैनंदिन प्रवास सुकर आणि सुलभ करणे आहे. हे एकच कार्ड मुंबई लोकल, मेट्रो, मोनो रेल, बसप्रवासासाठी वापरता येणार आहे.
लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या २३८ लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे.
( comprehensive policy benefit local industries from thermal power plants Chief Minister Devendra Fadnavis ) औष्णिक केंद्रांमधील राखेबाबत २०१६ मध्ये शासनाने केलेल्या धोरणात २० टक्के राख स्थानिक उद्योगासाठी आणि ८० टक्के लिलाव असे प्रमाण होते. परंतु केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार १०० % लिलाव करावा लागतो. या राखेचा स्थानिक उद्योगांना लाभ होऊन उद्योग वाढीसाठी शासन सर्वंकष धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
भारतीय रेल्वेमध्ये सरळसेवा भरतीतून थेट नियुक्ती झालेल्या आणि पश्चिम रेल्वेवरील पहिल्या मोटारवुमन प्रीती कुमारी यांच्याविषयी....
नुकतीच म्हणजे दि. ३ फेब्रुवारी रोजी भारतीय रेल्वेने विद्युतीकरणाची शंभरी गाठली. सन १८५३ मध्ये भारतात पहिली रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावल्यापासून ते आधुनिक विद्युतीकरणापर्यंत रेल्वे वाहतुकीने देशाच्या सर्वांगीण विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या आजवरच्या प्रवासात मुंबईचे ऐतिहासिक महत्त्व आहे. मुंबईकर आणि मुंबई लोकल हे नाते तर सर्वश्रुत. त्यामुळे भारतीय रेल्वे विद्युतीकरणाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील मुंबई लोकलच्या प्रगतीचा आढावा घेणारा लेख...
भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाला फेब्रुवारी,२०२५ रोजी १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी पश्चिम रेल्वेने उत्सवाचा भाग म्हणून एक प्रदर्शन आणि चर्चासत्र आयोजित केले होते. चर्चगेट रेल्वे स्थानकात उभारण्यात आलेल्या प्रदर्शनात लोकोमोटिव्ह, ईएमयू, मेमू आदी मॉडेल्स ठेवण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन मुंबईकरांसाठी पर्वणी ठरत आहे. मोठ्या संख्येने प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक या प्रदर्शनाला भेट देत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुतीतच लढणार, असे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
पावसाळ्यात मुंबईत उपनगरीय सेवा विनाअडथळा चालवण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. याअंतर्गत पावसाळ्यात पाण्यात ट्रॅक पाण्यात बुडालेल्या परिस्थितीत असताना पॉइंट मशीन फेल्युअर्स रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय प्रदान केल्याबद्दल मध्य रेल्वेने सर्वोत्कृष्ट नवोपक्रमाचे पहिले पारितोषिक जिंकले.
मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल आता सुपरफास्ट आणि आलिशान होणार असून या सेवेत लवकरच नवे आणि प्रवाशांच्या पसंतीला येतील असे बदल करण्याची भूमिका भारतीय रेल्वेने घेतली आहे. त्यातूनच खचाखच भरलेल्या डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुरेसे ऑक्सिजन मिळू शकेल अशा पद्धतीची रचना असणारे नवे डबे यासेवेत आणले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास मोकळा होऊ शकेल. या बदलासोबतच मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर नवे टर्मिनल उभारण्यासह उपनगरीय रेल्वे सेवेत नवे बदल होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वै
पाणथळ जागेचा आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ दर्जा प्राप्त ठाणे खाडीत दक्षिण अमेरिकेतील चारू शिंपल्यांनी ( Foreign Mussel ) बस्तान बसवले आहे. ज्याप्रमाणे विदेशी झाडे ही स्थानिक पर्यावरणीय परिसंस्थेच्या मुळावर उठली आहेत, त्याचप्रमाणे या चारू शिंपल्यांनी ठाणे खाडीतील किनारी परिसंस्थेला धक्का देण्यास सुरुवात केली आहे. याविषयी उहापोह करणारा लेख...
नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ( Local Body Election ) प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. न्यायालयाने मंगळवारी तसे निर्देश दिले आहेत.
मध्य रेल्वेवर रविवार, दि.२९ रोजी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुख्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांचा ‘खोळंबा’होणार आहे.
नवीन वर्षांसाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा या पर्यटन स्थळी थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. मुंबईकरच नव्हे तर पुणे, रायगड आणि राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दि. ५ आणि ६ डिसेंबरच्या मध्यरात्री (गुरूवार-शुक्रवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या दादर स्थानकावरील फलाट क्रमांक बदलण्यात आले आहे. दादर स्थानकातून मेल गाडयांनाही थांबे देण्यात येतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचा गोंधळ होतो. अशातच दोन्ही मार्गांवरही समान फलाट क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो. हा गोंधळ टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मध्य रेल्वेने दादर स्थानकावर रात्री १२ वाजेपासून aलागू केला आहे.
(Marathi Language)एकीकडे केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येतो तर दुसरीकडे आपल्याच मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीची वारंवार गळचेपी होताना दिसते. ज्या महाराष्ट्रात अन् मुंबईत मराठी भाषा रुजली, वाढली त्याच ठिकाणी मराठी भाषेच्या अपमानाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच मुंबईत पुन्हा एकदा मराठी भाषेविरोधातील संतापजनक घटना समोर आली.
प्रवाशांमध्ये एसी लोकल गाड्यांची वाढती लोकप्रियता आणि वाढती मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने आज बुधवार, २७ नोव्हेंबरपासून मुंबई उपनगरीय मार्गांवर एसी लोकल सेवेची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार या मार्गावर १३ नवीन एसी सेवा सुरू केल्याने, एसी सेवांची एकूण संख्या आता आठवड्याच्या दिवशी ९६ वरून १०९ आणि शनिवार आणि रविवार ५२ वरून ६५ होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
महाराष्ट्रात आज दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया आरामात आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रेल्वे, मेट्रो १, मेट्रो ३ आणि मेट्रो २ए आणि ७ तसेच, बीएसटीनेही त्यांच्या सेवा पहाटे ४ ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १ वाजेपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने ( Local ) रात्रकालीन विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) ते कल्याण आणि पनवेल यादरम्यान धिम्या मार्गावर बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पहाटे आणि मध्यरात्री उशिरा या गाड्या सोडण्यात येणार आहेत. निवडणूक कर्तव्य बजावणार्या अधिकारी, कर्मचार्यांसोबत सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनादेखील या सेवांचा फायदा होणार आहे.
अंबरनाथ येथे असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या रेल नीर प्लांटमध्ये लवकरच नवीन पाण्याची लाइन जोडली जात आहे, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल. उन्हाळ्यात मुंबईतील बहुतांश लोकल रेल्वे स्थानकांवर पाण्याची मागणी वाढते आहे. अनेक वेळा ही मागणी आयरसीटीसीकडून पूर्ण होत नाही. प्लांट सध्या दररोज २ लाख एक लिटर रेल नीरच्या बाटल्या तयार करतो, ज्या १४,००० बॉक्समध्ये पॅक केल्या जातात. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन लाईन जोडल्यानंतर ही क्षमता दररोज २०,००० बॉक्सपर्यंत वाढेल.
कांदिवली रेल्वे स्थानक परिसरात धीम्या आणि जलद मार्गावरील डाऊन ट्रॅकवर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा प्रभावित झाली. मंगळवार दि.१२ रोजी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. सुमारे तासाभरानंतर बिघाड दुरुस्त करण्यात आला, त्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत होऊ शकली, मात्र यादरम्यान बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून आली.