मुंबई, दि.२७ : प्रतिनिधी नवीन वर्षांसाठी मुंबई नगरी सज्ज झाली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर आणि पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन लाइन्स गिरगाव, दादर, माहिम, जुहू, वर्सोवा या पर्यटन स्थळी थर्टी फर्स्टचा आनंद घेण्यासाठी लोकांची गर्दी होते. मुंबईकरच नव्हे तर पुणे, रायगड आणि राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत येत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने विशेष सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
या नागरिकांसाठी मध्य रेल्वे चार विशेष गाड्या चालवणार आहे. तर पश्चिम रेल्वे ८ विशेष सेवा चालविणार आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या विशेष उपनगरीय सेवा चालवणार आहे. त्यानुसार, मंगळवार ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून आणि बुधवार 1 जानेवारी पहाटेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत चालवण्यात येणार आहेत. दरम्यान, या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मध्य रेल्वे (४ सेवा)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण या मार्गावर विशेष लोकल चालवणार आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १:३० वाजता सुटणारी लोकल पहाटे ३ वाजता कल्याण येथे पोहोचेल. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. तर कल्याण येथून १:३० वाजता सुटणारी लोकल पहाटे ३:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल.
हार्बर लाइन
सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर विशेष लोकल चालवणार आहे. त्यानुसार, सीएसएमटी येथून १:३० वाजता सुटणारी लोकल पहाटे २:५० वाजता पनवेल येथे पोहोचेल. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. तर पनवेल येथून १:३० वाजता सुटणारी लोकल पहाटे २:५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पोहोचेल. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल.
पश्चिम रेल्वे (८ सेवा)
डाऊन मार्ग
चर्चगेटहून मध्यरात्री १.१५ वाजता सुटेल आणि विरारला मध्यरात्री २.५५ वाजता पोहोचेल.
चर्चगेटहून मध्यरात्री २ .०० वाजता सुटेल आणि विरारला पहाटे ३.४० वाजता पोहोचेल.
चर्चगेटहून मध्यरात्री २.३० वाजता निघेल आणि विरारला पहाटे ४.१० वाजता पोहोचेल.
चर्चगेटहून मध्यरात्री ३.२५ वाजता सुटेल आणि विरारला पहाटे ५.०५ वाजता पोहोचेल.
अप मार्ग
विरारहून मध्यरात्री ००.१५ वाजता निघेल आणि चर्चगेटला १.५२ वाजता पोहोचेल.
विरारहून मध्यरात्री ००.४५ वाजता निघेल आणि चर्चगेटला ०२.२२ वाजता पोहोचेल.
विरारहून मध्यरात्री ०१.४० वाजता निघेल आणि चर्चगेटला ०३.१७ वाजता पोहोचेल.
विरारहून मध्यरात्री ०३.०५ वाजता निघेल आणि चर्चगेटला ०४.४१ वाजता पोहोचेल.